शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

यशाचा मंत्र असतो का? असल्यास कोणता? या गोष्टीतून जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 08:00 IST

माणसाने शेवटपर्यंत विद्यार्थी दशेतच राहावे असे म्हणतात. परंतु आपण 'पी हळद नि हो गोरी' या वाकप्रचारानुसार थोडेसे शिकलो तरी ...

माणसाने शेवटपर्यंत विद्यार्थी दशेतच राहावे असे म्हणतात. परंतु आपण 'पी हळद नि हो गोरी' या वाकप्रचारानुसार थोडेसे शिकलो तरी स्वत:ला सर्वज्ञ समजू लागतो. याबाबतीत एक गोष्ट आपल्या डोळ्यात अंजन घालणारी ठरू शकेल. 

एक चित्रकार आपल्या वडिलांकडून आलेला चित्रकलेचा व्यवसाय जोपासत त्यावर गुजराण करत होता. त्याला एक मुलगा होता. चित्रकार वृद्धापकाळाकडे झुकू लागला. तसा त्याचा हात थरथरू लागला. त्याला वाटले, की आता आपण आपल्या मुलाला या व्यवसायात उतरवले पाहिजे. वारशाने मुलाच्या अंगी देखील चित्रकलेचे गुण उतरले होते. त्याने वडिलांचा शब्द पाळला आणि सुंदर चित्र काढून त्यांना दाखवले. वडील म्हणाले, आता हे चित्र तू बाजारात नेऊन विक.

मुलगा बाजारात गेला आणि चित्र विकून आला. त्याला चित्राचे २०० रुपये मिळाले. तो नाराज झाला. म्हणाला, `बाबा तुमच्यासारखे चित्र काढूनही तुम्हाला ५०० आणि मला २०० च रुपये का मिळाले. तुम्ही मला यशाची गुरुकिल्ली दिली नाही का?'वडिल म्हणाले, 'बेटा आणखी थोडे प्रयत्न कर.'

मुलगा चित्र काढत होता, विकत होता पण ३०० ते ४०० रुपयांच्या वर त्याची मजल जात नव्हती. तो वडिलांवर रागावला. वडिल म्हणाले, 'तुझ्या कामात कमतरता कुठे राहतेय याचा नीट अभ्यास कर मग मी तुला यशाचा मंत्र देईन.'

मुलाने ठरवले, आज काहीही झाले तरी चित्र ५०० रुपयांना विकून दाखवायचे. तो ठरवून बाजारात गेला आणि काय आश्चर्य, त्या दिवशी त्याला चित्राचे ७०० रुपये मिळाले. तो आनंदाने परत आला आणि त्याने वडिलांना पैसे दाखवले. वडिलांनी त्याचे अभिनंदन करत सांगितले, 'आता मी तुला यशाचा मंत्र देतो.'मुलगा म्हणाला, `आता मला त्याची काहीच गरज नाही. तुम्ही तुमची चित्रे ५०० रुपयात विकत होतात, मी ७०० रुपयात ते विकून दाखवले आहे. मी जिंकलो आहे.'

हे ऐकून वडील म्हणाले, `बेटा याच वळणावर तुला त्या मंत्राची गरज लागणार आहे. कारण अनेक वर्षांपूर्वी मी सुद्धा हीच चूक केली होती. मी माझ्या वडिलांपेक्षा ३०० रुपयाचे चित्र ५०० रुपयांत विकून दाखवले होते. तेव्हा त्यांनी मला यशाचा मंत्र देणार, तोच मी त्यांना तुझ्यासारखाच मिजास दाखवला होता. ती चूक मला आतापर्यंत भोवतेय. आजोबांचे मी ऐकले असते, तर मला नवीन काही शिकता आले असते. मात्र माझ्या अहंकारात मी शिकण्याची प्रक्रिया थांबवली आणि आयुष्यभर मी ५०० रुपयांवर समाधान मानत राहिला़े तेच मी वडिलांचे ऐकले असते, तर कदाचित माझे उत्पन्न प्रत्येक चित्रामागे १००० रुपये असते. म्हणून तुझा प्रवास ७०० रुपयांवर थांबू नये असे वाटत असेल, तर एकच मंत्र लक्षात ठेव, तो म्हणजे `शिकणे थांबवू नकोस!' ज्याने शिकण्याची प्रक्रिया थांबवली त्याने ज्ञानाची कवाडे बंद केली असे समजावे.' म्हणून आपणही हा यशाचा मूलभूत मंत्र लक्षात ठेवून जे जे काही चांगले शिकायला मिळेल ते सातत्याने शिकत राहिले पाहिजे. तरच आपली प्रगती होत राहिल अन्यथा जेवढे आहे त्यात समाधान मानून विकासाची दारे बंद करावी लागतील.