शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
5
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
6
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
7
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
8
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
10
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
11
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
12
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
13
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
14
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
15
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
17
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
18
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
19
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू

शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:23 IST

विज्ञान आणि अध्यात्म हे हातात हात धरूनच पुढे जातात, याचा प्रत्यय तुम्हालाही या लेखावरून येईल हे नक्की!

मारुतीरायाचे अफाट कार्य मारुतिस्तोत्रात वर्णन करताना समर्थ रामदासांनी केवळ साहित्यच नाही, तर विज्ञानाची कास धरून स्तोत्रनिर्मिती केली आहे. याबाबत नुकताच वाचनात आलेला एक लेख पाहू. 

इंग्लंड मधील शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी लावलेल्या ‘सिम्युलेरीटी थेरम’ आणि ‘थर्मो- डायनॅमिक्स ऑफ ब्लॅकहोल्स’ या दोन क्रांतिकारी शोधामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठी क्रांती झाली.शास्त्र हे तर्क आणि सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते हे या शरीराने विकलांग पण बुद्धीने अत्यंत कणखर असलेल्या शास्त्रज्ञाने जगाला दाखवून दिले. ताऱ्याचा अंत होतो,तसाच संपूर्ण विश्वाचाही अंत होऊ शकतो असा निष्कर्ष हॉकिंग यांनी मांडला. जगभर हा सिद्धांत चर्चेचा विषय झाला.

भारतीय अणू वैज्ञानिक श्री रामदास स्वामी! खरेतर भारतीय विद्वान शास्त्रज्ञांना धर्माच्या कोंदणात बसवल्यामुळे त्यांना संत पद प्राप्त झाले पण त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचा बोजवारा उडाला. समर्थ रामदास स्वामी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.समर्थांनी लिहिलेले मारुती स्तोत्र धर्माची झापडे काढून शास्त्रीय नजरेने पाहीले तर फक्त मनन आणि चिंतन करून त्यांनी जे साहित्य (खरेतर शोध निबंध) लिहून ठेवले आहेत त्याचे अनन्य साधारण महत्व अधोरेखित होते.समर्थांना 'मारुती' या अणू शक्तिला ब्रिक हिस्ट्री ऑफ टाइम (विश्वोत्पत्तीचा सिद्धांत) हे म्हणायचे होते असा माझा ठाम विश्वास आहे. त्याची अनेक उदाहरणे फक्त एका मारुती स्त्रोत्रात दाखवता येतील.समर्थ रामदास स्वामी यांच्या ठायी अपरा मानसशास्त्र ज्याला Advance Psychology असेही म्हणतात ती जन्मताच अवगत होती.मानवता मनोविज्ञान (Humanistic Psychology) या गोष्टीचा विकास  १९५० साली झाला असे मानले जाते.परंतु सुमारे ३५० वर्षापूर्वी मनश्चिकित्सा (Psychotherapy) या विषयात श्री रामदास स्वामी हे जगाच्या कितीतरी पुढे होते हे त्यांनी दासबोधातून सिद्ध केले आहे.मारुती स्त्रोत्रा तील काही श्लोकांचा या ठिकाणी आपण विचार करू या ---

मारुती स्त्रोत्र हे अणु शक्ती चे वर्णन समर्थांनी एकांत गुहेत बसून कुठल्याही साधना शिवाय केले होते परंतु ते समजण्यात आपण कमी पडलो आहोत.

१) मनासी टाकले मागे गतीसी तुळणा नसे...मनाचा वेग हा ध्वनी आणि प्रकाशाच्या वेगाच्या पेक्षा प्रचंड असतो हे त्यांनी सांगीतलय.अर्थात वेगा बद्दल त्यांना सखोल ज्ञान होते.

२)अणू पासोन ब्रम्हांडा  एव्हडा होत जातसे........ Big bang theory!!!या वाक्यात समर्थांना लहानात लहान कण ज्याला आपण अणू Atom असे म्हणतो आणि ब्रह्मांड म्हणजे अनेक सूर्यमाला असलेला समूह असे म्हणतो या खगोल शास्त्रीय सत्याची जाणीव करून दिली   Big bang theory मध्ये महाविस्फोट सिद्धांत सांगितला आहे. महाविस्फोट सिद्धांतच्या अनुसार जवळजवळ १३.७ अब्ज वर्षापूर्वी अणू स्फोटातून एक उर्जा उत्पन्न झाली आणि तिचे स्वरूप सतत वाढत आहे. या स्फोटानंतर अंतरीक्ष हे  १.३ सेकंदात निर्माण झाले होते हे आता आधुनिक संशोधनात सिध्द झाले आहे ते समर्थांनी एका निर्जन गुहेत बसून आपल्याला  सांगितले होते.

३) कोटीच्या कोटि उड्डाणें,झेपावे उत्तरेकडे... पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाताना जी याने सोडली जातात त्या यानांना पृथ्वीची कक्षा सोडताना उत्तर दिशा अत्यंत योग्य असते हे त्यांनी जाणले होते.

४) आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा ...सूर्य मंडळ या शब्दाचा अर्थ अनेक सूर्य आणि त्यांचे उपग्रह आहेत हे त्यांनी एकांतात बसून जाणले होते.

५) वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा...पृथ्वीच्या कक्षे बाहेर "शून्य मंडळ" म्हणजे निर्वात पोकळी असते हे त्यांना माहिती होते. या शिवाय पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाताना प्रचंड उर्जा आवश्यक असते हे माहित असल्याने त्यांनी  "भेदिले" हा शब्द प्रयोग केला आहे.

६) दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें.चंद्राच्या कलेसारखा विस्तार आणि नंतर चंद्रकला जशी लहान होत जाते तशी ब्रह्मांडाची अवस्था होणार आहे हे जे काही स्टिफन हॉकिंग यांनी सांगितले तेच समर्थ रामदास स्वामींनी जगाला सांगितले होते‌, पण आपण त्यांची दृष्टी समजून घेण्यास कमी पडलो. प्रत्येक घटनेची शास्त्रीय कारण मीमांसा आपल्या देशातील संशोधकांनी केली होती. खगोल शास्त्राला आपण फल जोतिष्य थोतांड बनवले. आपल्याच ज्ञान देवांचा,संताचा,आपण विनाकारण अजाणते पणी अपमान केला‌ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग हे इंग्लंड मधील ज्ञानदेव होते. त्यांना आपण डोक्यावर घेणे उचितच आहे पण आपल्या ज्ञानदेवांना जागतिक मान्यता कधी मिळणार हाच तर कळीचा मुद्दा आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीचा, अफाट ज्ञानाचा अभिमानाचा अभाव असल्याने आपण अजूनही "तुझं आहे तुजपाशी पण मार्ग भुललाशी" याचा प्रत्यय येतो.

टॅग्स :Stephen Hawkingस्टीफन हॉकिंगscienceविज्ञानspiritualअध्यात्मिक