शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली कीर्तन कुलातर्फे यंदा समाजभूषण पुरस्काराचे मानकरी ह.भ.प. गंगाधर बुवा व्यास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 14:55 IST

दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीत होणाऱ्या कीर्तन सप्ताहाची सांगता १४ जानेवारी रोजी पुरस्कार सोहळ्याने होणार आहे, त्याचे सविस्तर वृत्त!

डोबिवली कीर्तन कुल संस्था आणि मराठा हितवर्धक मंडळ डोबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही देवर्षि नारद कीर्तन महोत्सव ८ ते १४ जानेवारी या कालावधीत आयोजित केला होता.  डोंबिवली पश्चिम येथील मराठा हितवर्धक मंडळाच्या सभागृहात झालेल्या या उत्सवाला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या उत्सवाची सांगता पुरस्कार सोहळ्याने होणार असून सर्व भाविकांनी त्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

डोंबिवली कीर्तनकुल संस्था आयोजित वैकुंठवासी दत्त दासबुवा घाग, नृसिंहवाडी यांच्या स्मृतिला अभिवादन करण्याकरिता या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या देवर्षि नारद कीर्तन महोत्सवाचा उद्घाटन समारंभ सोमवार दि.८/१/२०२४ रोजी सायं. ४.४५ वा. डोंबिवली कीर्तनकुल संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. सौ. अस्मिता देशपांडे आणि मराठा हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री. देवेंद्र देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या स्मृती कीर्तन महोत्सवात दररोज सायं. ५ ते ६.३० या वेळेत उदयोन्मुख कीर्तनकरांची कीर्तने, रात्रौ ८ ते १० महाराष्ट्रातील जेष्ठ-श्रेष्ठ नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली होती. जसे की, वर्षा काळे, अक्षय आयरे, संपदा गोखले, आरती मुनीश्वर, संतोष पित्रे, ज्योत्स्ना गाडगीळ, किरण तुळपुले, मंदार गोखले, श्रेयस बडवे, सुखदा मुळ्ये, शरद घाग. तसेच पेटी व तबला साथ, जयंत फडके, वासुदेव रिसबूड, विवेक बर्वे, अमृता तांबे, सुशील पाठक, हर्षद कुणकवलेकर, मंगेश मुळे, तारेकश जोशी या कलाकारांनी केली. 

कीर्तन महोत्सवाचा सांगता समारंभ मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला रविवार दि. १४/०१/२०२४ रोजी सायं. ५.०० वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमात दर वर्षी दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार हा.भ.प. श्री. गंगाधरबुवा व्यास यांना मा. श्री. माधवजी जोशी (लक्ष्मी नारायण ट्रस्ट संचालक) यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. सुहास सरपोतदार  :  ९३२२२६६६९४ / ८४२५८४२५४९

टॅग्स :dombivaliडोंबिवली