शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच मंदिरं पुनश्च खुली होत आहेत, तिथे गेल्यावर देवाकडे आधी 'हे' मागणं मागा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:59 IST

मंदिरात गेल्यावर काही गोष्टी आपण पाळतो. ते केवळ शास्त्र म्हणून नाही, तर त्यामुळे होणारे फायदे अनुभवता यावेत, म्हणून! कोणते आहेत ते फायदे, जाणून घेऊ.

मंदिरात गेल्यावर एक वेगळीच सकारात्मकता आपल्याला भारावून टाकते. चपला बाहेर ठेवून, पाय धुवून मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर बाह्य जगाशी नाते तुटते आणि अध्यात्मिक जगाशी नाते जुळते. फक्त अशा वातावरणात ईश्वर चिंतन मनात ठेवावे. अन्य विषय मनात डोकावू नये याकरिता मोबाईल बंद ठेवावा आणि देवाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करावा. बऱ्याच कालावधीनंतर मंदिरं भगवंताच्या दर्शनासाठी खुली होत आहेत. अशा वेळी देवाचे दर्शन घेऊन त्याच्याकडे काय मागायला हवे ते पाहू. यासाठीच मंदिरात गेल्यावर काही गोष्टी आपण पाळतो. ते केवळ शास्त्र म्हणून नाही, तर त्यामुळे होणारे फायदे अनुभवता यावेत, म्हणून! कोणते आहेत ते फायदे, जाणून घेऊ. 

ज्या देवाच्या दर्शनासाठी आपण रांग लावून शिस्तबद्ध पणे देवाचे दर्शन घेतो, ते दर्शन घेताना 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' अशी आपली अवस्था होते. कारण, मागे  गर्दीमुळे आपल्याला क्षणभरच दर्शन मिळते. त्या क्षणात आपण देवाचे दर्शन घेतो आणि लगेच डोळे मिटतो. कारण, आपल्याही नकळत आपल्या मनात भगवंताची असलेली प्रतिमा आणि डोळ्यासमोर दिसणारी प्रतिमा यांची तुलना होते. ते रूप मनात साठवून, इतरांची अडचण होऊ न देता, गाभाऱ्याच्या परिसरात गर्दी न करता, सभामंडपात येऊन तिथल्या ओट्यावर बसून ध्यान करतो. त्यावेळेस पुढील श्लोक म्हणावयाचा असतो, 

अनासायेन मरणम, विना दैन्येन जीवनमदेहान्ते तव सान्निध्यम, देही मे परमेश्वरम

अनासायेन मरणम, मला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता मरण दे, विना दैन्येन जीवनम, मला परावलंबी जीवन नको देऊ, देहान्ते तव सान्निध्यम, ज्या वेळी माझा प्राण निघेल त्यावेळी तुझे दर्शन दे, देही मे परमेश्वरम, हे परमेश्वरा मला या वरील गोष्टी दे, ही मागणी करावी. 

देह हे देखील देवाचे मंदिर आहे. म्हणून ज्यापरामाणे मंदिरात गेल्यावर आपण क्षणभर विश्रांती घेतो, तशी आत्मचिंतनाच्या दृष्टीने आपल्या मनाच्या कट्ट्यावर देखील ध्यान धारणेच्या निमित्ताने विश्रांती घ्यावी आणि आत्मारामाचे चिंतन, स्मरण करावे. त्याला साद घालावी आणि मनोभावे प्रार्थना करावी.