शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येला न विसरता करा तुलसी आणि पितृ पूजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:27 IST

Somvati Amavasya 2024: 30 डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे, वर्ष सरताना पितरांचे आणि तुलसी मातेचे आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करा; सविस्तर वाचा!

यंदा ३० डिसेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्या (Somvati Amavasya 2024)आहे. वर्षाअखेरीस आलेली ही अमावस्या अनेक दुर्मिळ योग घेऊन आली आहे. त्या मुहूर्तावर तुलसी आणि पितरांच्या पूजेचे महत्त्व धर्मशास्त्राने सांगितले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. 

हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावास्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते. तेव्हा शक्य नसेल तर निदान सोमवती अमावस्येला पितरांची व तुळशीची पूजा अवश्य करावी असे शास्त्र सांगते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्या 'या' चार राशींना देणार वर्षाअखेरीची 'खास' भेट!

सोमवती अमावस्येला शिव पार्वतीची पूजा :सोमवार हा भगवान शंकराचा. परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही. शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते. तसेच तुळशीचेदेखील पूजन केले जाते.  तुळशीला हरिप्रिया असेदेखील संबोधले जाते. म्हणजेच हरी आणि हर या दोहोंची कृपा व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशी पूजा करा असे सांगितले जाते. 

सोमवती अमावस्येचे महत्त्व :सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृ पितृ सेवा केली असता दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत पितृ दोष दिलेला असेल, त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

पूजेचा विधी: सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करावे. नदीत स्नान शक्य नसेल तर घरच्या घरी स्नान करताना गंगा, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा या पंचगंगांचे स्मरण करावे.  शिव शंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फुल, अक्षता वाहून पूजा करावी. धूप दीप दाखवावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत माळ ओढावी. दान धर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यथाशक्ती अन्न दान करावे.

नव्या वर्षात पदार्पण करताना पितरांचे आणि तुलसी रूपाने भगवान विष्णुंचे आशीर्वाद घेणे कधीही चांगले, त्यामुळे ही संधि अजिबात दवडू नका आणि वर दिल्याप्रमाणे तुलसी तथा पितृ पूजन करा आणि १ जानेवारी २०२५ पासून नवीन वर्षाची (New Year 2025)आनंदात सुरुवात करा. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीNew Year 2025नववर्षाचे स्वागत