शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Som Pradosh Vrat 2023: सोम प्रदोष व्रताचा शुभ काळ, व्रत विधी आणि मंत्र याबद्दल सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 18:43 IST

Som Pradosh vrat 2023: आज सायंकाळी सोम प्रदोष व्रत का करावे आणि ते केल्याने होणारे लाभ जाणून घ्या!

प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय.आज ३ एप्रिल रोजी सोमवारी प्रदोष  येत असल्याने तिला सोम प्रदोष म्हटले जाईल. ही शिव उपासकांसाठी संधी आहे. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (संध्याकाळी) सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते. 

प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. सोमवारी आगमन झाल्यामुळे त्याला सोम प्रदोष म्हणतात. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. सोम प्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सोम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. 

पौराणिक कथा : असे म्हणतात, की हे व्रत सर्वप्रथम चंद्र देवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला. या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोम प्रदोषाच्या दिवशी उपास करुन पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपास सोडावा. 

सोम प्रदोषामागे आणखीही एक व्रत कथा सांगितली जाते- 

एक विधवा स्त्री स्वतःचे व मुलाचे पालन पोषण करण्यासाठी दारोदार भीक मागत असे. मिळालेल्या अन्नातून दोघांचे पोषण होत असे. एक दिवस भीक मागत फिरत असताना तिला जखमी अवस्थेत एक मुलगा सापडला. तिला त्या मुलाची दया आली. तिने त्याला आपल्या सोबत झोपडीत नेले. त्यालाही घासातला घास खाऊ घातला. तो मुलगा बरा झाला. त्याने स्वतःची ओळख पटवून दिली. तो एका राज्याचा राजकुमार होता. परंतु शत्रूने त्याच्या राज्यावर आक्रमण करून त्याच्या वडिलांना बंदिवान केले होते. आणि त्याला राज्यातून हाकलून दिले होते. म्हणून त्याची दुरावस्था झाली होती. 

दिवस पुढे पुढे जात होते. एकदा एका गंधर्व कन्येचा राजकुमाराशी परिचय झाला आणि ती त्याच्या रूपावर लुब्ध झाली. त्याच्याशी लग्न करण्याचा तिने मनोदय व्यक्त केला. तिने आपल्या माता पित्याला तसे सांगितले. त्याची पूर्ण चौकशी करून गंधर्व कन्येच्या माता पित्याने आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. आपले सैन्य राजपुत्राला देऊन शत्रूशी लढा करण्याचे बळ दिले. राजकुमाराने आपले राज्य परत मिळवले. आई वडिलांची तुरुंगातून सुटका केली आणि ज्या स्त्रीने त्याला मदतीचा हात दिला होता, त्या स्त्रीचा राजपुत्राने सांभाळ केला आणि तिच्या मुलाला भविष्यात राज्यच्या प्रधान पद बहाल केले. ती स्त्री कायम प्रदोष व्रत भक्ती भावाने करत असल्यामुळे तिचे दिवस पालटले आणि नशिबात अनपेक्षितपणे राजयोग आला. 

सोम प्रदोष व्रतासाठी पूजेसाठी शुभ वेळ - ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.४५ पासून ७. ३४ पर्यंत. 

प्रदोष पूजा विधी : या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावे. घर स्वच्छ करावे. देवाची पूजा करावी. शिवलिंगावर बेल वाहावे. जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.  त्याचप्रमाणे महाकाल शंकराच्या महामृत्युंजय जपाचेही पठण करावे. 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्।उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।