शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Som Pradosh Vrat 2022: आज सोम प्रदोष; जाणून घ्या व्रताचा शुभ काळ, व्रत विधी आणि मंत्र याबद्दल सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 07:00 IST

Som Pradosh Vrat 2022: सोम प्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय.२०२२ वर्ष सरत असताना ५ डिसेंबर रोजी सोमवारी ही तिथी येत असल्याने तिला सोम प्रदोष म्हटले जाईल. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (संध्याकाळी) सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते. 

प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. सोमवारी आगमन झाल्यामुळे त्याला सोम प्रदोष म्हणतात. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. सोम प्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सोम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. 

पौराणिक कथा : असे म्हणतात, की हे व्रत सर्वप्रथम चंद्र देवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला. या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोम प्रदोषाच्या दिवशी उपास करुन पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपास सोडावा. 

सोम प्रदोषामागे आणखीही एक व्रत कथा सांगितली जाते- 

एक विधवा स्त्री स्वतःचे व मुलाचे पालन पोषण करण्यासाठी दारोदार भीक मागत असे. मिळालेल्या अन्नातून दोघांचे पोषण होत असे. एक दिवस भीक मागत फिरत असताना तिला जखमी अवस्थेत एक मुलगा सापडला. तिला त्या मुलाची दया आली. तिने त्याला आपल्या सोबत झोपडीत नेले. त्यालाही घासातला घास खाऊ घातला. तो मुलगा बरा झाला. त्याने स्वतःची ओळख पटवून दिली. तो एका राज्याचा राजकुमार होता. परंतु शत्रूने त्याच्या राज्यावर आक्रमण करून त्याच्या वडिलांना बंदिवान केले होते. आणि त्याला राज्यातून हाकलून दिले होते. म्हणून त्याची दुरावस्था झाली होती. 

दिवस पुढे पुढे जात होते. एकदा एका गंधर्व कन्येचा राजकुमाराशी परिचय झाला आणि ती त्याच्या रूपावर लुब्ध झाली. त्याच्याशी लग्न करण्याचा तिने मनोदय व्यक्त केला. तिने आपल्या माता पित्याला तसे सांगितले. त्याची पूर्ण चौकशी करून गंधर्व कन्येच्या माता पित्याने आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. आपले सैन्य राजपुत्राला देऊन शत्रूशी लढा करण्याचे बळ दिले. राजकुमाराने आपले राज्य परत मिळवले. आई वडिलांची तुरुंगातून सुटका केली आणि ज्या स्त्रीने त्याला मदतीचा हात दिला होता, त्या स्त्रीचा राजपुत्राने सांभाळ केला आणि तिच्या मुलाला भविष्यात राज्यच्या प्रधान पद बहाल केले. ती स्त्री कायम प्रदोष व्रत भक्ती भावाने करत असल्यामुळे तिचे दिवस पालटले आणि नशिबात अनपेक्षितपणे राजयोग आला. 

सोम प्रदोष व्रतासाठी पूजेसाठी शुभ वेळ - ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६पासून ७. ३० पर्यंत

प्रदोष पूजा विधी : या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावे. घर स्वच्छ करावे. देवाची पूजा करावी. शिवलिंगावर बेल वाहावे. जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.  त्याचप्रमाणे महाकाल शंकराच्या महामृत्युंजय जपाचेही पठण करावे. 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्।उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।