शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sita Navami 2022 : सर्वशक्तिमान रावण सीतेचे अपहरण करू शकला पण सीतेला आपलेसे करू शकला नाही, कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 11:43 IST

Sita Navami 2022 : आज सीता नवमी. बलाढ्य रावणाला आपल्या पातिव्रत्येसमोर झुकवणाऱ्या देवी सीतेची कथा!

अलीकडच्या काळात अनेक जण रावणाचे समर्थन करताना आढळतात. रावण महान विद्वान, पंडित, शूर, वीर, सर्व कलांमध्ये निपुण होता, परंतु त्याने या सर्व गुणांचा गैरवापर केल्यामुळे त्याचा उदो उदो करणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. त्याने सीतेचे अपहरण करूनही तिला वासनेने स्पर्श केला नाही, असा चुकीचा समज करून घेतला जातो. वास्तव हे आहे, की इच्छा असूनही रावण सीतेला स्पर्श करू शकला नाही. त्याचे कारण उत्तरकांड मध्ये सापडते. 

वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडमध्ये २६ व्या अध्यायात ३९ व्या श्लोकात रावणाला मिळालेल्या शापाचे वर्णन आढळते. त्यात दिलेल्या पौराणिक कथेनुसार, रावणाने भगवान शिवशंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्याकडून वर प्राप्त झाल्यावर रावण अधिकच शक्तिशाली बनला. तो त्रैलोक्यावर राज्य करायला निघाला. स्वर्ग लोक काबीज करायला निघालेला असताना तो आपला भाऊ कुबेर याच्या राज्यावर स्वारी करू पाहत होता. वाटेत त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली. रंभा ही केवळ अप्सरा नव्हती तर कुबेरांची होणारी सून आणि कुबेर पुत्र नलकुबेर याची होणारी पत्नी होती. 

रंभेला पाहताच मोहित झालेला रावण तिला वश करण्याचे प्रयत्न करू लागला. रंभेने त्याला हटकले. त्याने स्वतःचा परिचय दिल्यावर रंभा म्हणाली, तुम्ही तर माझे होणारे चुलत सासरे आणि मी तुमची भावी सून आहे.  तसे असताना तुम्ही माझ्याशी असा व्यवहार करणे योग्य नाही. म्हणून तुम्ही माझा मार्ग अडवू नका. परंतु रावण तिच्यावर आपली शक्ती आजमावू लागला. रंभेने तिथून पळ काढला आणि तिने नलकुबेराला येऊन सगळी हकीकत सांगितली. त्यावर रागाच्या भरात नलकुबेराने आपल्या सख्ख्या काकाला म्हणजेच रावणाला शाप दिला, 'तू कोणत्याही परस्त्रीला मनाविरुद्ध स्पर्श केलास तर तुझे शीर धडापासून वेगळे होईल. तू दशानन राहणार नाहीस. तुझा लौकिक पुसला जाईल.' 

या शापामुळे रावण पतिव्रता सीतेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करू शकला नाही. म्हणूनच तो तिची मनधरणी करत होता. परंतु सीता त्याच्या प्रलोभनांना भुलली नाही. तिचे रामावर आणि रामाचे सीतेवर निस्सीम प्रेम होते. याच गोष्टीची रावणाला मनस्वी चीड होती. म्हणून त्याने रामाला संपवण्याचा निश्चय केला होता. परंतु झाले वेगळेच! रावणाचा हेतू शुद्ध नसल्यामुळे त्याचा पराजय आणि रामाचा विजय झाला. म्हणून यापुढे कधीही रावणाचा उदो उदो करण्याआधी ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा. 

सीतेप्रमाणे समस्त महिलांना हे वरदान मिळो आणि त्यांच्या शक्तीसमोर रावणासारख्या खलवृत्तीच्या लोकांची त्यांना स्पर्श करण्याची हिमंत न होवो, हीच सीता नवमीच्या निमित्ताने देवी सीतेकडे प्रार्थना!

टॅग्स :ramayanरामायण