शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यातील सगळ्या अडचणी, दु:खं दूर करण्यासाठी शालेय जीवनातला हा सोपा आणि प्रभावी उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 17:13 IST

जे लोक प्रश्न कधी सुटतील याचा विचार करतात, ते कायम अडकून राहतात आणि जे लोक प्रश्न कसे सुटतील यासाठी प्रयत्न करतात, ते हमखास परिस्थितीतून मार्ग काढतात.

मानसशास्त्राचा तास सुरू होणार होता. विद्यार्थी आपापल्या जागेवर बसले होते. शिक्षक येताच सगळ्यांनी एकत्र उभे राहून त्यांना अभिवादन केले. शिक्षकांनी सर्वांना बसण्याची अनुमती दिली. टेबलावर पाण्याचा एक पेला आणि जग ठेवला होता. शिक्षकांनी रिकामा पेला अर्धा भरला आणि तो हातात धरत विद्यार्थ्यांकडे पाहिले. विद्यार्थ्यांना वाटले, आता नेहमीचा ठरलेला प्रश्न विचारला जाणार, `पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा?'

पण तसे झाले नाही. शिक्षकांनी वेगळाच प्रश्न विचारला. ते म्हणाले, पाणी ओतलेल्या या पेल्याचे वजन साधारण किती असेल? या अनपेक्षित प्रश्नाने विद्यार्थी गोंधळले. त्यांनी आपल्या परीने वेगवेगळी उत्तरे दिली. त्यांचे बोलून झाल्यावर शिक्षक म्हणाले, `पेल्याचे वजन किती आहे, हे महत्त्वाचे नसून पाण्याचा पेला तुम्ही किती वेळ धरून ठेवणार आहात, हे महत्त्वाचे आहे. हा पेला तुम्ही एक मिनिटं धरून ठेवला तर तुम्हाला त्याचे वजन जाणवणार नाही. तासभर धरून ठेवला, तर हाताला मुंग्या येतील. एक दिवसभर धरून ठेवला, तर हात जड होईल आणि कधी एकदा तो पेला हातून टाकून देतो असे होईल.

तीच बाब आपल्या समस्यांची आहे. आपले प्रश्न, समस्या यांच्याकडे काही क्षण पाहिले, तर आपल्याला त्रास होणार नाही. तासभर त्याचा विचार केला, तर डोके जड होईल. दिवसभर विचार केला तर डोके भणाणून जाईन. मग सबंध आयुष्य त्याच चिंतांचा, समस्यांचा विचार करत राहिलो तर वेड लागण्याचीच वेळ येईल. 

यावर उपाय हाच आहे, की जे प्रश्न सोडवता येतील त्याची उकल शोधण्याचा प्रयत्न करा. विचार करायचाच असेल तर पर्यायाचा करा, समस्यांचा नाही! तोही किती वेळ करायचा हे ठरवून टाका. कोणतेही कारण असो, त्रास तुम्हालाच होणार आहे. तो करून घेऊ नका. पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा याचबरोबर तो किती वेळ धरून ठेवायचा, याचाही विचार करून ठेवा. 

मनसोक्त जगा. प्रश्न आज आहेत उद्या नाहीत. परिस्थिती बदलत असते. अति विचाराने प्रश्न सुटत नाहीत. जे लोक प्रश्न कधी सुटतील याचा विचार करतात, ते कायम अडकून राहतात आणि जे लोक प्रश्न कसे सुटतील यासाठी प्रयत्न करतात, ते हमखास परिस्थितीतून मार्ग काढतात. जे प्रश्न सुटत नाहीत, ते सोडून द्या, आपोआप सुटतील. परंतु प्रश्नांमागे लागून आयुष्य संपवू नका. आयुष्यात करण्यासारखे बरेच काही आहे. यासाठी शाळेतला एक नियम लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्नपत्रिका हाती आल्यावर येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून आपण मोकळे होत असू आणि जे येत नाहीत, ते सोडून देत असू, हाच सोपा उपाय आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना उपयोगात आणू, म्हणजे सोडवलेले प्रश्न जास्त गुणांची कमाई करून देतील.