शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Shukra Pradosh 2022: वैवाहिक अडचणी तसेच विवाहदोष निवारणासाठी शुक्र प्रदोषाच्या तिथीवर करावे 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 12:07 IST

Shukra Pradosh 2022: ज्यांना कुंडलीत शुक्र ग्रह अनुकूल असतो त्यांना वैवाहिक सुखाबरोबर प्रसिद्धी, पैसा अमाप मिळतो. पण ज्यांना शुक्रदोष असेल त्यांनी शुक्र प्रदोष व्रत जरूर करावे !

२३ सप्टेंबर रोजी शुक्र प्रदोष आहे. हे व्रत दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि त्रयोदशीला येते. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी प्रदोष व्रत शुक्रवारी येत आहे. म्हणून याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाईल. या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवन समृद्ध होते. केवळ फळे, फुले, धूप-दीप इत्यादींनी पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात, असे शास्त्रात सांगितले आहे. त्याचबरोबर शिवकृपा प्राप्त होण्यासाठी अन्य उपायही सांगितले आहेत, ते जाणून घेऊया-

>> शुक्रवार देवीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी लाल, गुलाबी आणि पांढरे फुल देवीला वाहता येईल. ज्यांना विवाह ठरण्यात अडचण येत आहे त्यांनी यादिवशी शंकराला अभिषेक घालून पत्र, पुष्प, अत्तर लावून मनोभावे पूजा करावी. 

>> ज्यांच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत, वादावाद आहेत अशा दाम्पत्यांनी शुक्र प्रदोषाच्या मुहूर्तवार शिव पार्वतीची पूजा आवर्जून करावी. तसेच साधकाने ओम नमः शिवाय आणि ओम उमामहेश्वराभ्यं नमः या मंत्राचा जप करावा.

>> विवाहित जोडप्याने शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला लाल किंवा पांढऱ्या फुलांच्या माळा अर्पण कराव्यात. ही पूजा शक्यतो एकत्र करून शिव पार्वतीच्या आशीर्वादाने नात्यातला गोडवा जपण्याचा प्रयत्न करावा आणि शिवपार्वतीचा आदर्श ठेवावा. 

>> शिवाला भस्म प्रिय असल्याने पुरोहितांच्या संमतीने शिवलिंगाला भस्मलेपन करावे आणि शिवस्तोत्र गावे. या पूजेने मानसिक शांतात मिळते. तसेच दैनंदिन अडचणींमधून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते. 

>> प्रदोष व्रताच्या दिवशी शिव आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करावी. तसेच ओम गौरीशंकराय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यासोबतच जीवनात सुख-समृद्धी येते.