शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: ११ दिवस सेवा करा, गुरुबळ-कृपा मिळवा; स्वामी अशक्यही शक्य करतील!

By देवेश फडके | Updated: March 19, 2025 11:14 IST

Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. ११ दिवसांचा संकल्प करून तुम्हाला शक्य आहे, तशी स्वामी सेवा करण्याची सुवर्ण, सर्वोच्च संधी आहे. जाणून घ्या...

Shree Swami Samarth Prakat Din 2025: ०१ मार्च २०२५ ते २६ एप्रिल २०२५ या संपूर्ण कालावधीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा असल्याचे सांगितले जाते. कारण, ०१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महापर्वणी होती. तर, ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तसेच २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतारकार्य समाप्तीचा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर असते, याची अनेक उदाहरणे, अनुभव सातत्याने ऐकले, बोलले जातात. आपल्यावरही स्वामी कृपा व्हावी, अशी इच्छा असेल, तर स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून ११ दिवस स्वामींची विशेष सेवा करणे अत्यंत पुण्याचे आणि शुभ ठरू शकते, असे सांगितले जाते. ३१ मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे. आपण नेमके काय करू शकतो, जाणून घेऊया...

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. चैत्र शुद्ध द्वितीया ही स्वामी समर्थ प्रकट होण्याची तिथी आहे. स्वामी महाराजांनी आपल्या अवतारकार्यात अनेक लीला केल्या. अनेकांचा उद्धार केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. दांभिकता, अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही. अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. सेलिब्रिटींपासून ते अगदी सामान्यांपर्यंत अनेक जण स्वामींचे अनुभव शेअर करतात. अडचणीच्या काळात सगळे मार्ग संपल्यावर स्वामींना समस्या सांगितली तर हाकेला धावून येतात, असाही अनेकांचा अनुभव आहे.

संकल्प करा अन् स्वामी सेवा सुरू करा

११ दिवस स्वामी सेवा करायची असेल, तर त्या आधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. आपल्या मनातील इच्छा, भाव सांगावा. नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे, हे मनाशी पक्के करावे. ही सेवा ही सुरुवात आहे, असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी. अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल, तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे.

स्वामी मंत्रांचा जप, स्तोत्रांचे पठण आणि नामस्मरण

श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो. एक मानसिक बळ मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्रांचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती मंत्राचा जप करावा. दररोज किमान १०८ वेळा किंवा शक्य असेल तितका जप करावा. परंतु, यात सातत्य असावे. शक्यतो सकाळी लवकर उठून स्नानादि कार्य उरकल्यानंतर मंत्राचा जप करणे सर्वांत उत्तम. सकाळी अगदीच शक्य नसेल तर प्रदोष काळी म्हणजेच तिन्हीसांजेला दिवेलागणीच्या वेळेस हात-पाय स्वच्छ धुऊन मंत्राचा जप करावा. स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावे. तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करावे. परंतु, स्तोत्रांचे श्रवण करताना चित्त एकाग्र असावे. आपणच स्तोत्र म्हणत आहोत, असा भाव असावा. 

गुरुलीलामृत, स्वामी चरित्रामृत सप्ताह पारायण

३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून गुरुलीलामृत, स्वामी चरित्रामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे. तसा संकल्प करावा. या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून सप्ताह पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर तीन दिवसीय पारायण पद्धती किंवा या ग्रंथात दिल्यानुसार पारायण करावे. पण एकदा संकल्प केला की, त्यात खंड पडू देऊ नये. 

अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य हवे. मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये. एकदा संकल्प केला की, तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे. शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी. 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिकshree datta guruदत्तगुरुakkalkot-acअक्कलकोट