शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!

By देवेश फडके | Updated: June 19, 2025 13:06 IST

Shree Swami Samarth Tarak Mantra Upay In Marathi: श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र अतिशय प्रभावी, उपयुक्त मानला जातो. या मंत्राचा उपाय अगदी रामबाण ठरतो, असे सांगितले. जाणून घ्या...

Shree Swami Samarth Tarak Mantra Upay: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य, नियमित, दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात, अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जो तो आपापल्यापरिने स्वामींची सेवा करत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. समस्या, अडचणी, संकटे, चणचण, भय अशा अनेक गोष्टींवर स्वामींचा तारक मंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

स्वामींचा प्रभावी तारक मंत्र नियमित म्हणता? पण नेमका अर्थ काय? पाहा, कालातीत लाभ

‘तारक मंत्र’ या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करताच. तारक मंत्र स्वरुपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते. जर हा मंत्र तुम्ही हळूहळू, संथ लयीत म्हटला तर खूपच बळ देतो, अंगात शक्ती संचारते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. 

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायचे आहे? कसे करावे? पाहा, योग्य पद्धत, फलश्रुती

घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी तारक मंत्राचा प्रभावी उपाय

तारक मंत्रामध्ये ताकद आहे. एक घरातील पिण्याचा पाण्याचा पेला घ्यावा. डाव्या हातात पेला घ्यावा. उजवा हात त्या पेल्यावर ठेवावा किंवा उजव्या हाताची पाच बोटे त्या पाण्यात बुडवावीत. यानंतर ११ वेळा तारक मंत्र म्हणायचा. प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तुमच्या संपूर्ण घरात शिंपडा. यासाठी एका पैशाचा खर्च होत नाही. कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. एखादा पेढा तुमच्यासमोर प्रसाद म्हणून येतो, तेव्हा तो तुम्हाला बाधत नाही. परंतु, प्रमाणापेक्षा जास्त किंवा मिठाई आवडते म्हणून हवे तसे खाल्ले, तर ते बाधते. ज्याने कोणतीही औषधी मात्रा घेतलेली असते, त्याने पथ्यही सांभाळायचे असते. मनापासून सेवा करावी. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. 

तारक मंत्राचा आणखी एक उपाय ठरेल अत्यंत उपयुक्त

एक घरातील पिण्याचा पाण्याचा पेला घ्यावा. डाव्या हातात पेला घ्यावा. उजवा हात त्या पेल्यावर ठेवावा. यानंतर ११ वेळा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्रात अतिशय ताकद असल्यामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तीर्थ म्हणून ग्रहण करावे आणि घरातील सर्व सदस्यांनाही तीर्थ म्हणून द्यावे. अतिशय सकारात्मक आणि समर्पण भाव ठेवूनच ११ वेळा तारक मंत्राचे पठण करावे. कोणताही नकारात्मक विचार त्या कालावधीत मनात येऊ देऊ नये. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी. स्वामी समस्या, संकटातून तारतील, योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील, असा विश्वास ठेवावा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते, असा अनेकांचा अनुभव आहे.

तारक मंत्राचा अत्यंत रामबाण उपाय कधी करावा?

सदर उपाय सकाळी किंवा सायंकाळी करू शकता. सकाळी स्वामींचे पूजन झाल्यावर हा उपाय केला जाऊ शकतो. धावपळीमुळे सकाळी शक्य झाले नाही, तर सायंकाळी दिवेलागणीच्या वेळेस स्वामींसमोर दिवा लावावा. काहीतरी नैवेद्य दाखवावा. त्यानंतर तारक मंत्राचा उपाय करावा. हा उपाय करताना संकल्प करावा. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असेल, आता मार्ग संपले, अशी भावना झाली असेल, समोर केवळ आणि केवळ अंधारच दिसत असेल, तर आणि तरच सदर उपाय करावा, असे सांगितले जाते. अन्यवेळेस आपली नियमित स्वामी सेवा सुरू ठेवावी. सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा शक्य होईल, तेव्हा दिवसातून एकदा तरी तारक मंत्र म्हणावा. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य हवे, असे म्हटले जाते. 

तारक मंत्राची अनेकांना आलीय प्रचिती

या मंत्रात एक कडवे आहे की ‘अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी’, फक्त आणि फक्त या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा. त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, असेही स्वामी भक्त, उपासक सांगतात. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखांतून संरक्षण आणि आधार प्रदान करतो, असे मानले जाते.

स्वामींचा अत्यंत प्रभावी तारक

निःशंक हो, निर्भय हो, मना रेप्रचंड स्वामीबळ पाठीशी रेअतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामीअशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामी पाय तिथे न्यून कायस्वये भक्त प्रारब्ध घडवी ही मायआज्ञेविणा काळ ना नेई त्यालापरलोकही ना भिती तयाला ।।२।।

उगाची भीतोसी भय पळू देजवळी उभी स्वामी शक्ती कळू देजगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचानको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।

खरा होई जागा तू श्रद्धेसहितकसा होशी त्यावीण तू स्वामीभक्तकितीदा दिला बोल त्यांनीच हातनको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थस्वमीच या पंचप्राणामृतातहे तिर्थ घे, आठवी रे प्रचितीन सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

।। श्री स्वामी समर्थ ।। 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधी