शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:35 IST

Shani Jayanti 2025: शनी जयंती नेमके काय करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकेल? जाणून घ्या...

Shani Jayanti 2025: हिंदू नववर्ष सुरू झाले असून, वर्षभर अनेकविध पद्धतीचे सण-उत्सव साजरे केले जातात. अनेक प्रकारची व्रत-वैकल्ये केली जातात. मराठी वर्षातील वैशाख महिना सुरू असून, लवकरच या महिन्याची सांगता होत आहे. वैशाख अमावास्येला शनैश्चर जयंती असते. २०२५ मध्ये शनी जयंती कधी आहे? या दिवशी नेमके काय करावे? शनैश्चर जयंतीचे महात्म्य, महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया...

वैशाख अमावास्या शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. शनी हा नवग्रहांपैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानला जातो. यंदा २०२५ मध्ये सोमवार, २६ मे रोजी शनैश्चर जयंती आहे. याच दिवशी वैशाख सोमवती अमावास्येचे व्रतही केले जाणार आहे. शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याकडे असतो. माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो. तो कधी कुणावर अन्याय करत नाही, असे सांगितले जाते. 

शनी जयंतीच्या दिवशी काय करावे?

शनैश्चर जयंतीला आवर्जून शनि मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे. या वेळेस शनी महाराजांना काळे तीळ, तेल अर्पण करावेत. शनि जयंतीला पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा दाखवावा. शनि जयंतीला शनिदेवाशी संबंधित वस्तू काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचे तेल यांचे दान करावे. या दिवशी शनिदेवासह हनुमानाचे पूजन, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. शनी मंत्राचा जप करावा. शनैश्चर स्तोत्र, शनी चालीसा यांचे पठण करावे.

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे. शनि न्यायाधीश आहे.  शनि साडेसाती आणि शनि महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनैश्चय जयंतीचा सुवर्ण योग सोडू नये. ही सुवर्ण संधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनि सेवा करावी. या दिवशी शनि उपासना, नामस्मरण, आराधना, जपजाप करावेत. यामुळे शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. याशिवाय शनी जयंती दिनी महादेव शिवशंकर, हनुमान, श्रीकृष्ण यांचे केलेले पूजन, नामस्मरण शनि प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होते, असे सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :shani shinganapurशनि शिंगणापूरPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिक