शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

Sankashti Chaturthi 2023: शनिवारी संकष्टी, जाणून घ्या चंद्रोदयाचा मुहूर्त, पूजाविधी आणि बाप्पाचे खास मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 13:08 IST

Sankashti Chaturthi Mantra 2023: संकष्टीचा उपास आपण करतोच, जोडीला बाप्पाची साधी सोपी उपासना कशी करता येईल तेही जाणून घेऊया!

प्रत्येक मासाच्या कृष्ण चतुर्थीला 'संकष्ट चतुर्थी' चे व्रत केले जाते. हे व्रत फार प्राचीन आहे. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चारचौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदामातेनेदेखील हे व्रत केल्याचा उल्लेख आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते.  ११ मार्च २०२३ रोजी संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2023) आहे, त्यानिमित्त जाणून घेऊया या व्रताविषयी सविस्तर माहिती. 

संकष्ट चतुर्थीचा व्रतविधी : या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हनात अर्घ्य द्यावे. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपास सोडावा. उपास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. हे एक काम्यव्रत आहे. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही ईच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. 

व्रतनियम : हे व्रत करताना आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करणे जरूरी आहे. कित्येक लोक संकष्टीचा उपास सकाळी फक्त चहा घेऊन किंवा निर्जळी उपास करतात. परंतु, तसा उपास सर्वांच्या प्रकृतीला सहन होतो असे नाही. अशा वेळी उपासाचे वातुळ पदार्थ खाऊन उपास करण्यापेक्षा उपास न करणे प्रकृतीच्या दृष्टीने योग्य ठरते. याउलट फलाहार करून उपास केला आणि रात्री पूर्णान्न भोजन ग्रहण केले, तर दिवसभर केलेल्या तपश्चर्येचा तना-मनाला निर्मळ आनंद मिळतो आणि झोपही छान लागते. 

संकष्टीची उपासना : या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. देवाची करुणा भाकावी, त्याच्या सान्निध्यात राहावे, पूजा करावी, अभिषेक करावा. यामुळे पूजेत मन एकाग्र होते. बाह्य विश्वाचा विसर पडतो. मुखी नाम यावे, याकरीता 'ओम गं गणपतये नम:' या मंत्राचा जप करावा. अथर्वशीर्ष पाठ असल्यास त्याची ११ किंवा २१ आवर्तने करावी. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तीभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. आपली ईच्छा देवासमोर प्रगट करावी आणि ईच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. ईच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही!

संकष्ट चतुर्थी तिथी : ११ मार्च २०२३ रोजी फाल्गुन मासातील संकष्ट चतुर्थी असून १०. ०६ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.  (Sankashti Chaturthi 2023)

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी