शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi 2022: संकष्टीला जुळून येत आहे सर्वार्थ सिद्धी योग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 14:06 IST

Sankashti Chaturthi 2022: संकष्टीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. या योगात केलेली पूजा आणि शुभ कार्य अनेक शुभ फळ देते.

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि मनोभावे गणपतीची पूजा केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. यंदा संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने संकष्टीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.

संकष्ट चतुर्थी ही बाप्पाची आवडती तिथी! जून महिन्यात १७ तारखेला शुक्रवारी संकष्ट चतुर्थी येत आहे. बाप्पा हा सुखकर्ता आणि दुःखंहर्ता आहेच! म्हणून आपण त्याही उपासना करतो आणि यश मिळावे अशी प्रार्थना करतो. यासाठीच हे संकष्टीचे व्रतही मनोभावे केले जाते. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे या संकष्टीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. या योगात केलेली पूजा आणि शुभ कार्य अनेक शुभ फळ देते. बाप्पाकडून यश, सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो!. त्यासाठी आपण शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊ. 

शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय :संकष्ट चतुर्थी तिथी १७ जून रोजी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवार, १८ जून रोजी पहाटे २. ५९ मिनिटांनी समाप्त होईल. याच दिवशी म्हणजे, १७ तारखेला सकाळी ९.५६ ते १८ जून रोजी पहाटे ५.०३ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल. १७ जून रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.२५ पर्यंत अभिजात योग आहे. या काळात केलेल्या पूजेला विशेष महत्त्व असते. तसेच या व्रताची पूर्तता चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. चंद्रोदयाची वेळ रात्री १०. ०३ मिनिटांची असेल. 

पूजा विधी : 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर आंघोळ करून संकष्टी चतुर्थीचे व्रतसुरु करावे. उपास करावा देवपूजा करावी. त्यानंतर शुभ मुहूर्तावर बाप्पाला अभिषेक करावा. चंदन टिळा, मोदक, फळे, फुले, वस्त्र, धूप, दीप, गंध, अक्षत, दुर्वा इत्यादी अर्पण करा. अथर्वशीर्षाचे पठण किंवा श्रावण करा. चतुर्थीच्या व्रताची कथा ऐका. शेवटी गणेशाची आरती करा. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्ध्य देऊन गणपतीची आरती म्हणा आणि जेवणाच्या ताटाचा नैवेद्य दाखवून उपास सोडा. 

सर्वार्थ सिद्धी योगाचा लाभ व्हावा म्हणून :वर दिल्यानुसार दुपारी अभिजात मुहूर्तावर बाप्पाला अभिषेक घालणे शक्य नसल्यास निदान त्या तासाभरात 'ओम गं गणपतये नमः' हा जप करा. त्यासाठी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. ऑफिसमध्ये जपमाळ नेणे शक्य नसेल तर बोटाच्या पेरांवर मोजून जप करा. पण या सर्वार्थ सिद्धी योगाचा लाभ अवश्य घ्या! बाप्पा मोरया... 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी