शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi 2022 : जास्वंदाचे फुल आणि दुर्वा वाहिल्या नाहीत तरी चालेल, पण संकष्टीला 'या' चुका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:07 IST

Sankashti Chaturthi 2022 : देवाला अमुकेक गोष्टीच हव्यात असे काही नाही, तो भोळ्या भावानेही संतुष्ट होतो. पण काही गोष्टी टाळणे इष्ट ठरते!

गुरुवार, १३ ऑक्टोबर रोजी नवीन संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण सगळेच भक्तिभावाने करतो. दिवसभर उपास करून, सायंकाळी अथर्वशीर्षाचे पठण आणि आरती करून चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतो. बाप्पाला प्रिय असलेले मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो. मग तो प्रसाद आपण घेतो. अर्थात बाप्पाची मर्जी संपादन करण्यासाठी आपण वरील सर्व गोष्टी भक्ती भावाने करत असतो.

या गोष्टींबरोबरच आणखी तीन चार गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या व्रताला नक्कीच पूर्णत्व येईल. हे नियम महिलांसाठी असण्याचे कारण एवढेच, की महिला घरात विशेष सक्रिय असतात. घरातील योग्य अयोग्य गोष्टींकडे त्यांचा बारीक कटाक्ष असतो. पुढील गोष्टी त्यांनी अंमलात आणल्या तर आपोआपच घरचेसुद्धा तिचेच अनुकरण करतील. चला तर जाणून घेऊया चार मुख्य गोष्टी-

>> बाप्पाला पितांबर अर्थात पिवळे वस्त्र प्रिय म्हणून उपास सोडताना घरातले पुरुष पितांबर नेसतात. हाच नियम स्त्रियांनीदेखील पाळावा. उपास सोडताना गणेश पूजेपूर्वी पिवळे स्वच्छ वस्त्र परिधान करावे. तसे करणे शक्य नसेल तर निदान काळे वस्त्र परिधान केलेले नसावे, ही बाब लक्षात ठेवावी. 

>> संकष्ट चतुर्थी व्रत हे चंद्र दर्शन घेऊन मगच पूर्ण होते. त्या दिवशी चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये अशी शास्त्राची शिकवण आहे. हे चंद्र दर्शन घेताना चंद्राला दूध, तांदुळाचा नैवेद्य दाखवून पाण्याने अर्घ्य द्यावे. ते पाणी आपल्याच पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. 

>> संकष्टीचा दिवसभर उपास केल्यावर गणपती पूजन करावे. अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र ११ वेळा किंवा २१ वेळा आणि अगदीच शक्य नसेल तर निदान एक वेळा एका जागी स्थिर बसून म्हणावे. त्यामुळे डोकं आणि मन शांत राहते आणि मन शांत झाले की नवनवीन गोष्टी आत्मसात होण्यास मदत होते. 

>> संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो. कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय असतात. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर पर्याय म्हणून तुळशी दल बाप्पाला वाहू नये. एकवेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा पण तुळशी कदापि वाहू नये असे शास्त्र सांगते. 

या गोष्टींचे पालन करण्याची सवय आपण लावा आणि घरच्यांनाही वळण लावा. बाप्पा मोरया!

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी