शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
3
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
4
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
5
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
6
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
7
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
8
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
9
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
10
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
11
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
12
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
13
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
14
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
15
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
16
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
17
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
18
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
19
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
20
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   

Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:40 IST

Sankashti Chaturthi 2025: आजच्या तणावग्रस्त जीवनशैलीत छोट्या मोठ्या कारणांनी मन उद्विग्न होतं, त्यावर प्रभावी उपाय संकष्टीच्या निमित्ताने जाणून घ्या.

आज संकष्टी चतुर्थी(Sankashti Chaturthi 2025). कलियुगात गणपती, देवी, शंकर, विष्णू या देवतांची उपासना प्रभावी सांगितली आहे. त्यामुळे अनेक जण संकष्टीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने आयुष्यातील संकटावर मात करण्याचे बळ मिळते. यासाठीच एका प्रभावी स्तोत्राची माहिती इथे देत आहे, जे म्हटल्याने वा ऐकल्याने तत्काळ मन:शांति मिळते हा भाविकांचा अनुभव आहे. 

संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

गणक ऋषींनी लिहिलेले गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र हा एक सिद्ध मंत्र आहे. या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केले आहे. अर्थात आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही, तर तो चराचरात, कणाकणात सामावला आहे. हे सांगताना गणक ऋषी म्हणतात तू ब्रह्म, तू विष्णू, तू रुद्र, तू इंद्र... एवढेच काय तर आमच्या मूलाधार चक्राशी तुझा नित्य वास असतो. असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सन्निध असतो. त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरुपाची प्रचिती देणारे आहे. ते रोज म्हटल्यामुळे होणारे लाभ जाणून घेऊ. 

अथर्व या शब्दाचा अर्थ आहे, थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे जे चंचल नाही ते. शीर्ष म्हणजे डोकं. आपलं डोकं शांत असेल तर आणि तरच आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे अथर्वशीर्षाचा पहिला लाभ म्हणजे आपले चित्त शांत होते, ज्या डोक्यात विचारांचे वादळ सुरु असते ते वादळ या स्तोत्रपठणाने स्थिर होते. यासाठी ते स्तोत्र शांतचित्ताने म्हटले पाहिजे. उरकून टाकल्यासारखी घोकमपट्टी केली तर त्याचा उपयोग नाही. त्याचे उच्चार, अर्थ समजून उमजून म्हटले तर त्याचा प्रभाव पडेल आणि त्याचा लाभ जाणवेल. 

Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!

हे स्तोत्र अथर्ववेदाशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. त्यात ''गं'' चा उच्चार वारंवार आढळतो. गं हा शब्द नसून हा महामंत्र आहे. त्यात ताकद एवढी आहे, की गणपती अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन केले असता इप्सित मनोकामना पूर्ती होते असे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे. यासाठी अनेक जण संकष्टीच्या निमित्ताने पुरोहितांकडून सहस्रावर्तन करवून घेतात. त्यासाठी काही नियम प्रकर्षाने पाळले पाहिजेत. ते पुढीलप्रमाणे-

- स्तोत्राचे उच्चार स्पष्ट हवेत. - काम करता करता म्हणण्याचे हे स्तोत्र नाही. देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे. - पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे. - स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत. - स्तोत्राचे पावित्र्य जपण्यासाठी शुचिर्भूतता पाळावी. - गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी. - स्तोत्र पाठ नसेल तर स्तोत्र श्रवण करा, डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवा. जेणेकरून मन भटकणार नाही आणि पठणाचा उद्देश पूर्ण होईल. - स्तोत्राची आवर्तने करताना फलश्रुती सर्वात शेवटी एकदाच म्हणावी. - सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर ३,७,९,११, २१ वेळा आवर्तने करावीत. मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणा, तरच लाभ होईल.  

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiपूजा विधी