शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संकल्प हवा साधेपणाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 03:20 IST

दरवर्षी अबालवृद्ध स्त्री-पुरुष, सर्वच बाप्पाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करीत असतात. मग इथे खर्चाचा विचार केला जात नाही. परंतु, या वर्षी तसे नाही.

- दा. कृ. सोमणगणपती सुखकर्ता आहे, विघ्नहर्ता आहे. यंदा कोरोना प्रादुर्भावाचे विघ्न जगावर आहे. ते दूर करण्यासाठी, प्रादुर्भाव टाळण्यासाठी या वर्षी आपण आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साधेपणाने, नियमांचे पालन करूनच साजरा करू या. लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन या वर्षी शनिवार, २२ आॅगस्ट रोजी होत आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे. पार्थिव म्हणजे मातीच्याच गणेशमूर्तीचे पूजन या दिवशी करायचे असते. दरवर्षी अबालवृद्ध स्त्री-पुरुष, सर्वच बाप्पाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करीत असतात. मग इथे खर्चाचा विचार केला जात नाही. परंतु, या वर्षी तसे नाही.या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन वेगळ्या परिस्थितीत होत आहे. कोरोना साथीमुळे अनेक बंधने पाळावी लागणार आहेत. स्वयंशिस्तीचे पालन करावे लागणार आहे. गणेशमूर्ती न मिळणे, पूजा साहित्य न मिळणे, पूजा सांगायला पुरोहित न येणे, मूर्तीचे विसर्जन बाहेर न करता येणे इत्यादी अनंत अडचणींशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करायचा आहे. तसा संकल्प प्रत्येकानेच मनाशी करायचा आहे.गणपती हा विघ्नहर्ता आहे. तोच आपल्या अडचणी दूर करणार आहे. नदीकाठी जायचे, तिथलीच माती घेऊन स्वत:च मूर्ती बनवायची, तिथेच पूजा करून विसर्जन करायचे अशी साधेपणाने गणेशपूजनाची प्रथा सुरू झाली.आता शास्त्रात काय सांगितले आहे ते आपण पाहू या. एखाद्या वर्षी अडचणींमुळे गणपती आणता आला नाही तरी चालते. अमुकच दिवस गणेशपूजन करायला पाहिजे असेही नाही. दरवर्षी परंपरेप्रमाणे आपण पाच-दहा दिवस गणेशोत्सव साजरा करीत असलो तरी या वर्षी दीड दिवस पूजन केले तरी चालेल. मातीची लहान मूर्ती आपणच तयार करावी हे उत्तम! ती एकाच रंगात रंगविली तरी चालेल. मूर्ती छोटी असावी; पण श्रद्धा-भक्ती मोठी असावी. पूजेला मिळेल ते साहित्य वापरावे. नाहीतर, त्याऐवजी अक्षता अर्पण कराव्यात. पूजा सांगायला पुरोहित मिळाले नाहीत तर स्वत: पुस्तकावरून पूजा करावी. पुस्तक नसेल तर जमेल तशी मनोभावे साधी पूजा करावी. या वर्षी गणेश दर्शनासाठी आप्तेष्टमित्रांना बोलवू नये.आॅनलाइन अ‍ॅपवरून गणेशाचे दर्शन उपलब्ध करावे. त्यामुळे सर्वांना पूजा-आरती, अथर्वशीर्ष पठन यामध्ये सहभागी होता येईल. गणेशमूर्तीचे विसर्जन बादलीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात करावे. तेही आप्तेष्ट-मित्रांना आॅनलाइन अ‍ॅपवरून पाहता येईल. या वर्षी साधेपणाचा संकल्प करून शिस्त पाळून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करायचा आहे.आपण पूजा का करतो? तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी! प्रगल्भ बुद्धिमत्ता, उत्कृष्ट नेतृत्वगुण, क्षमाशील वृत्ती, मातृभक्ती, शिस्तप्रियता इत्यादी गुण गणपतीपाशी होते. ते आपल्या अंगी यावेत यासाठी पूजन करायचे आहे. गणपती सुखकर्ता आहे, विघ्नहर्ता आहे. तो सर्व काही जाणतो. या वर्षी गणपती आपली सर्वांची परीक्षाच पाहत आहे. गणेशोत्सव साधेपणाने व शिस्त पाळून आपण साजरा करून त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ या.(लेखक पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक आहेत.)

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सव