शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

संत तुकोबाराय सांगत आहेत, आदर्श घराची व्याख्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 5, 2021 18:59 IST

आजच्या काळात सुखवस्तू घर आहे, परंतु घरात राहणारे सुखी नाहीत. कारण, त्यांचा आपापसात सुसंवाद होत नाही. चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत नाही. चांगले विचार कानावरदेखील पडत नाहीत. पूर्वी आजी-आजोबा रामरक्षा, भीमरूपी स्वत: म्हणत आणि नातवांकडून म्हणवून घेत. आता कोणाचा पायपोस कोणाला नसतो. अशा घरात सुख समृद्धी कशी वास करणार?

ज्योत्स्ना गाडगीळ

'ज्याचा कोणी नसतो, त्याचा मोबाईल असतो आणि ज्याच्याजवळ मोबाईल असतो, तो कुणाचा नसतो.' असे मार्मिक आणि मजेशीर विधान समाज माध्यमांवर वाचले. आधी हसू आले, परंतु स्वयंकेंद्री झालेल्या समाजाचे वास्तव त्या एका वाक्याने अधोरेखित केले. सद्यस्थितीत, मी आणि माझे यापलीकडचे विश्व आपल्याला दिसतच नाही. समाज माध्यमांमुळे व्यक्ती सोशल होण्याऐवजी अधिकच एकटी पडत असताना दिसत आहे. दर तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासली आहे. का? कशामुळे? तर आत्मकेंद्री झाल्यामुळे. सतत दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करता करता, मनुष्य स्वत:चे सुख हिरावून बसला आहे. आत्मभान विसरत आहे. जगण्याचे ध्येय विसरत आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, 

आपुलिया हिता जो होय जागता, धन्य मातापिता तयाचिया।कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विका, तयाचा हरिख वाटे देवा।गीता भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे।तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही।

धन्य आहेत ते लोक, जे कितीही खडतर प्रसंग आले, तरी आपल्या ध्येयापासून ढळत नाहीत. ते स्वत:चा आणि आपल्या बरोबर कुटुंबाचा, समाजाचा, राज्याचा, राष्ट्राचा उद्धार करतात. नैराश्यावर मात करतात. त्यांना जन्म देऊन त्यांचे माता पिताही धन्य होतात. अडी अडचणींवर मात करून ज्या मुली स्वत:ला सिद्ध करतात, आपले कसब पणाला लावून लोकोपयोगी काम करतात, समाजाला दिशा देतात, जबाबदाऱ्या सार्थपणे सांभाळतात, त्यांना या पृथ्वीवर पाठवून देवालाही त्यांचा हेवा वाटत असावा. 

हेही वाचा : जेवायला बसताना 'पाने घ्या' म्हणतात, ते यासाठीच!

आजच्या काळात सुखवस्तू घर आहे, परंतु घरात राहणारे सुखी नाहीत. कारण, त्यांचा आपापसात सुसंवाद होत नाही. चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत नाही. चांगले विचार कानावरदेखील पडत नाहीत. पूर्वी आजी-आजोबा रामरक्षा, भीमरूपी स्वत: म्हणत आणि नातवांकडून म्हणवून घेत. आता कोणाचा पायपोस कोणाला नसतो. अशा घरात सुख समृद्धी कशी वास करणार? घराला सांधून ठेवण्यासाठी संस्कारांचा मजबूत पाया असावा लागतो. परमार्थाची गोडी असावी लागते. श्लोक, स्तोत्र, संतविचार यांचे ध्वनी उमटावे लागतात. तिथेच लक्ष्मी आणि सरस्वती नांदते.

तुकाराम महाराज म्हणतात, अशा घराचा आपणही आदर्श ठेवला पाहिजे. जिथे सत्संग घडेल, तिथे गेले पाहिजे. जिथे समाजकार्य घडत असेल, तिथे आपणही सहभाग घेतला पाहिजे. अशा ठिकाणी केलेली सेवा, ही ईशसेवेचा भाग आहे. 

हेही वाचा : ... म्हणून साने गुरुजी आजीवन एकवेळ जेवत असत!