शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतात राबताना संत सावता माळी विठ्ठल नाम घेऊ शकतात, तर आपण का नाही?; संत सावता माळी पुण्यतिथी विशेष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 09:40 IST

संतांनी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या भक्तीने असामान्य पद गाठले आणि ते ईश तत्त्वाशी एकरूप झाले. आपणही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे!

काल संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी झाली, आज अर्थात २७ जुलै रोजी संत सावता माळी यांची पुण्यतिथी आहे. शेतात मळा फुलवता फुलवता विठ्ठल पायी गोविला गळा, ही किमया त्यांनी साध्य केली. या संतांनी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या भक्तीने असामान्य पद गाठले आणि ते ईश तत्त्वाशी एकरूप झाले. 

संत, महंत, पुण्यात्मे, देशभक्त, समाजसेवक यांची जयंती, पुण्यतिथी का साजरी करायची? तर त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची उजळणी करता यावी म्हणून! त्यांच्या आयुष्यात सर्वकाही आलबेल होते असे नाही, तर प्रतिकूलतेवर मात करून त्यांनी आपले ध्येय कसे गाठले याचा आदर्श त्यांच्या चरित्रातून मिळतो. आपल्याला जगण्याचे उद्दिष्ट मिळते. परिस्थितीशी सामना करण्याचे धैर्य मिळते. काय चांगले, काय वाईट याचा सारासार विचार करून ध्येय निश्चिती करता येते, म्हणून त्यांचे वेळोवेळी स्मरण!

संत सावता माळी हे संत पदाला पोहोचले ते आपल्या कृतीतून. अध्यात्म जोडायचे म्हणजे नुसते देव देव करत बसायचे असे नाही, तर आपल्या कामात आपला देव शोधायचा. जसा सावता माळी, गोरा कुंभार, सेना न्हावी इ. संतांनी शोधला. जनाबाई तर दळिता कांडिता देवाचे नाव घेई. मात्र हे नाव निःस्वार्थ बुद्धीने घेतले जात असे. म्हणून या संतांना परमेश्वर प्राप्त झाला. आपणही मनात काही मिळावं हा हेतू न बाळगता मुखी नाम आणि प्रामाणिकपणे काम केले तर आपल्यालाही ईशकृपा मिळू शकते अशी ग्वाही आपल्याला संत देतात. 

संत सावता माळी पुढील अभंगात सोदाहरण ते पटवून देतात -

कांदा-मुळा-भाजी ।अवघीं विठाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी ।अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रातळू ।अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरीअवघीं व्यापिली पंढरी

सावता म्हणें केला मळा ।विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥

समजायला अतिशय सोपा अभंग आहे, पण अंगवळणी पडायला कठीण! परंतु प्रयत्न केला तर तेही अशक्य नाही. संत सावता माळी यांना स्मरून आपणही आजपासून आपल्या कामागणिक, श्वासागणिक देवाचे नाम घेऊया आणि देवरूप होऊया!