शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Safala Ekadashi 2024: सफला एकादशीला १०८ वेळा 'हा' विष्णुमंत्र म्हणा आणि तुमचे ध्येय सुफळ संपूर्ण करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:14 IST

Safala Ekadashi 2024: तुमचे ध्येय कोणतेही असो, त्या प्रयत्नांना जोड लागते उपासनेची; सफला एकादशीनिमित्त विष्णुंचा अत्यंत प्रभावी असा मंत्र जाणून घेऊ आणि जप करू.

२६ डिसेंबर रोजी सफला एकदशी (Safala Ekadashi 2024) आहे. सफला अर्थात यश देणारी, हेतु, ध्येय सफल करणारी एकादशी असा तिचा लौकिक आहे. त्यानिमित्ताने आपण आपल्या ध्येयाप्रती स्वत:ला झोकून द्यायचेच आहे, शिवाय आपल्या प्रयत्नांना उपासनेची जोड म्हणून विष्णु मंत्र म्हणायचे आहेत, तेही १०८ वेळा! जेणेकरून तुमचीही सफला एकादशी सुफला अर्थात सुफळ संपूर्ण होणारी एकादशी ठरेल. ती उपासना कशी व कोणती ते पाहू.  

'जप'तो, त्याला भगवंत 'जपतो', असे म्हणतात. भगवंताच्या नाम:स्मरणाचे जीभेला आणि मनाला वळण लागावे, म्हणून जप केला जातो. भगवंताच्या नामाचा पुनरुच्चार आणि मन एकाग्र करायला लावणे, हा त्यामागील विचार असतो. जप केल्यामुळे आचारही शुद्ध होतो. 

जपाची सवय का लावावी, याचे उत्तर शोधायचे, तर संत सोयरोबानाथ यांच्या अभंगाच्या ओळी आठवतात,

हरिभजनाविण काळ घालवू नको रे,अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे।।

चांगल्या गोष्टी आपोआप घडत नाहीत, त्या घडवाव्या लागतात. तशाच चांगल्या सवयी आपोआप लागत नाहीत, त्या लावाव्या लागतात. प्रापंचिक माणसाच्या मुखात नाम:स्मरण सहजासहजी येत नाही, ते जाणीवपूर्वक घ्यावे लागते. ती सवय लावण्याचे माध्यम म्हणजे 'जप.' जपाच्या माळेत १०८ मणी असतात. त्या संख्येगणिक नाम घेत असताना किमान एखादवेळेस तरी मनापासून नाम निघावे, हा उद्देश असतो. 

जप कसा करावा?

जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या पेरावर माळ धरून अंगठ्याने तिचे मणी आपल्याकडे ओढायचे असतात. माळेतील मण्यांची झीज होऊ नये, म्हणून ते आपटणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मेरूमणी येताच माला विरुद्ध बाजूने मोजण्यास सुरू करावी. 

एका व्यक्तीची माळ दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये. माळ जपण्यापूर्वी आणि वापरून झाल्यावर माळेला नमस्कार करावा. पवित्र ठिकाणी जपमाळ ठेवावी. शक्यतो एखाद्या कापडी पिशवीतून किंवा डबीतून जपमाळ ठेवावी. जपमाळेची संख्या एकाएक न वाढवता, क्रमाक्रमाने वाढवावी. मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. शुद्ध मनाने नाम:स्मरण घ्यावे. जप करताना मन शांत व्हावे, यासाठी शांत परिसराची निवड करावी. सुखासनात बसून डोळे मिटून जप करावा. 

आपल्याला एक वाईट खोड असते, ती म्हणजे नाम:स्मरण सुरू करताच जपमाळेकडे पाहण्याची. जेमतेम दहा मणी ओलांडून होत नाही, तो आपले लक्ष जपमाळेकडे जाते. याचा अर्थ, आपले मन नाम:स्मरणात नसून केवळ सोपस्कारात अडकले आहे. जपसाधनेचा संबंध पाप-पुण्याशी नसून, आपल्या आचार-विचारांशी निगडित आहे. म्हणून त्या सरावाला 'जपसाधना' म्हटले जाते.  ज्याप्रमाणे एखादे सुभाषित, श्लोक, कविता, गाणे पाठ होण्यासाठी आपण शंभर वेळा घोकमपट्टी करतो, तसेच भगवंन्नाम मुखोद्गत होण्यासाठी १०८ संख्या सुनिश्चित केली आहे. जपसाधनेत एवढ्यावर थांबणे अपेक्षित नसून, ही सुुरुवात आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे आपणही संख्येत अडकून न राहता, मेरुमणी हाताला लागेपर्यंत अखंड नाम:स्मरण घेत राहावे. 

ऊँ नमो भगवते वासुदेवाय.

 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी