शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Rituals : आजच्या काळातही कुळधर्म कुळाचार का महत्त्वाचे आहेत? ते केल्याने काय लाभ होतात? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:57 IST

Rituals : शांत निरोगी निरामय आरोग्यपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे आपल्या कुलदैवतांचे नित्य स्मरण आणि पूजन, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

>> ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित 

आपल्या पूर्व कर्मानुसार आपण विशिष्ट कुळात जन्म घेतो . प्रत्येक कुळाची एक देवता असते जिला आपण कुलस्वामिनी आणि कुल दैवत असे म्हणतो. आपल्या घराण्याचे  कुलदैवत कुठले आहे हे प्रत्येकाला माहित असलेच पाहिजे . माहित नसेल तर माहित करून घेतले पाहिजे. हिंदू धर्मात अनेक रूढी परंपरा प्रथा आहे त्याची जपणूक आणि त्याचा वारसा पुढील पिढीला सुपूर्द करणे आपले परम कर्तव्य आहे पण त्याआधी आपल्याला ह्या गोष्टींचे शास्त्रशुद्ध ज्ञान असणे आवश्यक आहे. आजकाल आपले गोत्र कुठले आहे हेही अनेकांना माहित नसते  तसेच आपले मूळ गाव आणि दैवत हेही माहित नसते. 

आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर, सर्व चढ उतारांवर अखंड आपले रक्षण करते ते आपले कुलदैवत. अनेकांचे कुलदैवत गावाला असते ,मग त्याचे मंदिर असो किंवा त्याची मूर्ती घरातच असो. वर्षातून एकदा तरी त्याचे दर्शन घेणे आवश्यक आहे. पण काही कारणामुळे गावाला दर्शनाला जाणे शक्य नसेल तरी राहत्या घरी सुद्धा कुलधर्म कुळाचार करता येतात.

आज अनाकलनीय अनेक दुखणी आणि आजार आपण ऐकतो, कुणाच्या नोकऱ्या अचानक जातात तर कुणाच्या घरावर जप्ती येते , अनेक दुःख आणि त्रासांनी मनुष्य हैराण होतो आणि त्याला मार्ग दिसत नाही ,मग अश्यावेळी  नैराश्य व्यसनाधीनता ह्या गर्तेत तो सापडतो आणि परतीचा मार्ग जणू विसरतो.  आयुष्यात कठीण प्रसंग येतात पण आपण जर नित्य आपल्या कुल देवतांचे पूजन करत असू तर त्यातून बाहेर यायचा मार्गही मिळतो हे निर्विवाद सत्य आहे.

कुलस्वामिनी आणि कुल दैवत ह्यांचे पूजन कसे करावे ह्याच्या प्रथा प्रत्येक कुळात वेगवेगळ्या आहेत . अनेकांच्या देवीची गावाला जत्रा , उत्सव असतो त्यावेळी मग देवीची पूजा ,भंडारा, जागरण ,महानेवैद्य असतो. त्यानिमित्ताने गावातील आणि गावा बाहेर मुंबई पुण्याकडे गेलेले अनेक लोक एकत्र भेटतात . अनेकांच्या कडे देवीचा गोंधळ असतो . घरात लग्नकार्य झाले की देवीचा गोंधळ घालण्याचीही प्रथा आहे . श्रावण, नवरात्र  ह्या महिन्यात देवीचा जो वार असेल त्या वारी सवाष्ण भोजन घालायचीही तसेच कुमारिका पूजन करायची सुद्धा प्रथा आहे. घरात कुठलेही शुभकार्य जसे लग्न , मुंज झाले कि बोडण सुद्धा घातले जाते.

आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय , पारंपारिक आधार दिलेला आहे . त्या समजून घेवून ह्या प्रथांचे पालन केले तर आपला प्रपंच सुखाचाच होईल.ज्या प्रकारे नवीन लग्न झालेल्या मुलींचे हौशीने हळदीकुंकू आपण करतो तो देवीसाठी केलेलाच एक उपचार आहे . श्रावणातील मंगळागौरी पूजन, नवरात्रातील माळ, घागरी फुंकणे ह्या सर्वातून आपण आपल्या देवीची आराधना करत असतो. श्रावणातील शुक्रवारी देवीची पूजा करून एखाद्या सवाष्णीला चणे-गुळ आणि दुध ,गजरा वेणी देवून तिला नमस्कार करणे हेही एक व्रतच आहे.  एखाद्या शुक्रवारी देवीला कुंकुमार्चन करता येते . अनेक कुळात श्रावणातील जीवतीपूजन करण्याची प्रथा आहे तसेच पिठोरी अमावास्या हे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केले जाणारे व्रत आहे.

मंडळी, आपले नित्य जीवन चालूच असते, मागील पानावरून पुढे! पण आपल्या कुलदेवतांचे नित्य पूजन, आपले सणवार आनंदाने हौशीने केले तर आपले नित्य जीवन आपल्याला कधीही निरस वाटणार नाही ,तेच जीवन पुन्हा नवीन बहर आणि जगण्याची उमेद घेवून येईल. 

आपण आपल्या कुलस्वामिनीचे नित्य पूजन आरती केली तर आपल्या घरातील मुली येणाऱ्या सुना ह्यानाही त्याची माहिती होईल आणि गोडीही लागेल. आपण म्हणतो कि आमच्या सुना करणार नाहीत त्या आधुनिक आहेत त्यांना वेळ नसतो .पण मला हे अजिबातच पटत नाही कारण त्या आधुनिक असतील पण तुम्ही तरी त्यांना कुठे आपल्या रिती ,आपल्या परंपरा समजून सांगितल्या आहेत? त्या करणार किंवा करणार नाहीत हे गृहीत धरणे कितपत योग्य आहे? बघा विचार करा नक्कीच पटेल. 

आजची  पिढी विचारांनी आधुनिक असली तरी समंजस आहे आजकाल कुणालाच वेळ नसतो, नोकऱ्या टिकवायचे आव्हान असते. माणूस तरी किती गोष्टींवर लढणार म्हणून जीव थकून जातो पण ह्या सर्वातून सुद्धा मनापासून एखादा दिवस, काही तास ह्या पूजेसाठी आपण नक्कीच करू शकतो . घरातील सर्वांचा सक्रीय सहभाग असेल तर घरातील एकट्या स्त्रीवर सर्व भार येणार नाही. ह्या सर्वातून अत्युच्य आनंदाचे असे चार क्षण आपण वेचतो , त्या निम्मित्ताने घरातील मंडळी एकत्र येतात, सुख दुःखाच्या चार गोष्टी होतात ,कुटुंबात एकोपा राहतो आणि आपल्याकडून सर्वात मुख्य म्हणजे कुळाचार होतो.

नित्य कुळाचार करणे हे साधनेपेक्षा खचीतही कमी नाही. ही सुद्धा एक उपासना साधना आहे. आपल्यावर कुलस्वामिनीची अखंड कृपा असते, ती आपली नस ओळखून असते आणि काट्याकुट्यांतून आपल्याला मार्गस्थ करत असते . अनेक लोक म्हणतात आम्हाला कुलदैवत माहित नाही. आजकाल अनेक ठिकाणी कुलसंमेलने भरतात, शोधले तर देवही सापडतो तेव्हा कुलदैवत किंवा गोत्र माहिती करून घ्या आणि त्याचे नित्य पूजन करा.  

शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते |