शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Rituals: साष्टांग नमस्कार पुरुषांनी घालावा, पण स्त्रियांनी नाही; असे का? जाणून घ्या शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 10:07 IST

Rituals: नमस्कार करणे हा संस्कार आहे आणि तो शास्त्रशुद्ध रित्या हे आपले कर्तव्य आहे, जाणून घ्या योग्य पद्धती!

नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात, असे म्हणतात. नमस्कार करण्यात नम्र भाव असतो. जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढी जास्त झुकते आणि जिच्या ठायी अहंकार असतो, ती ताठ राहते. परंतु, ज्येष्ठ-श्रेष्ठ लोकांपुढे, माता-पित्यांपुढे, वडिलधाऱ्या मंडळींपुढे, अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते. परंतु आजच्या काळात नमस्कार करणे, हे कमीपणाचे वाटते. नमस्कार कर, असे मुलांना सांगावे लागते. कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना आढळत नाहीत. मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार, गुडघ्यावर बसून डोके टेवकवून नमस्कार किंवा येता जाता राम राम म्हणत अभिवादन करणे ही सवयच लोकांच्या अंगवळणी पडली होती. 

पूजेत जे षोडशोपचार आहेत, त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे. दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार. देव देवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होत असते. नमन, प्रणाम, प्रणती, नती, दंडवत असेही शब्द नमस्काराला आहेत. 

या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत. कायिक, वाचिक आणि मानसकि हे ते तीन प्रकार आहेत. कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय. तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण, हा नमस्कार करते वेळी हृदय, माथा, पाय, गुडघे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात, म्हणून याला अष्टांग प्रणाम असेही म्हणतात. या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायामबरोबरच मानसिक नमन किंवा प्रणामही अभिप्रेत असतो. सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो. हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे.

मात्र स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये, कारण... 

स्त्रियांचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण आहे. कारण जमीन अर्थात भूमी जे कार्य करते, तेच स्त्रीदेखील करते. गर्भातून नव्या जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते. म्हणून तिने अष्ट अंगांमधील ही दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकवत नमस्कार करावा, असे शास्त्र सांगते. 

याशिवाय, हरि ऊँ, रामराम, हरहर महादेव, जयजय रघुवीर समर्थ असे आपण वाचेने मंदिरात गेल्यावर म्हणतो, हा एक प्रकारचा वाचिक नमस्कारच आहे.विशेषत: आंघोळ करताना जुन्या पिढीतील मंडळी `हरगंगे भागीरथी' असे म्हणतात. गंगेला तर हिंदुमात्रांच्या जीवनात अनन्यसाधारण भक्तिभावनेचे स्थान आहे. जीवनात एकदा कधी तरी काशीला हरद्वारला जाऊन आल्यावर तेथील गंगेचे वा अशा दूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मनापुढे आणणे, हा झाला मानसिक नमस्कार. तेथे जाणे शक्य झाले नसेल, तरी वाचिक नमस्कार केला तरी चालतो. 

म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता कायिक, वाचिक किंवा मानसिक नमस्कार अवश्य करा आणि पुढच्या पिढीवरही हा संस्कार घाला.