शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिन, केवळ हक्कांची नाही तर कर्तव्याची आठवण करून देणारा दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 07:00 IST

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाला राजपथावर होणारी परेड पाहताना आपल्याला नागरिकत्त्वाची आणि देशभक्तीची जाणीव होते हे नक्की!

>> सर्वेश फडणवीस  

२६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्थापन झाले. अर्थात आपण भारतीय राज्य घटना स्वीकारून प्रजासत्ताक झालो. गेल्या ७० वर्षांत एखादं धोका सोडला तर भारतातील लोकशाही अगदी सुरळीत सुरू आहे.

स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिले. संविधान प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. खरं तर जे संविधान नागरिकांना भारतात जगण्याचा अधिकार देतो; तेच संविधान भारत संघराज्याच्या नागरिकांकडून काही अपेक्षा करते.

आपण जेव्हाही संविधानावर चर्चा करतो, तेव्हा केवळ आपल्याला भारतीय नागरिक म्हणून मिळालेल्या हक्कांची चर्चा करतो. ते हक्क आपल्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाहीत, शिवाय ती हक्क हिरावून घेतली तर संविधानीक अथवा अगदी असंवैधानिक मागनिही तो मिळवण्यासाठी आपण भांडण्यास तत्पर असतो. संविधानाने आपल्याला समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्ध, धर्म स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क बहाल केले आहेत.

गणतंत्र आणि नागरिक हे एकमेकांसाठीच बनले आहेत. सुखी, समाधानी, सुरक्षित आणि शांत समाज जीवनासाठी आपली कर्तव्ये योग्य पद्धतीने पार पाडणे हेच प्रत्येकाचे लक्ष्य असले पाहिजे. आणि हीच भावना जपत राष्ट्रहित सर्वतोपरी हेच उद्दिष्ट समोर ठेवून सार्वजनिक जीवनातील वाटचाल करावी.

आपण आपल्या अधिकाराची मागणी करीत असताना आपली समाजाप्रती देशाप्रती असलेली कर्तव्ये सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत, याचे भान सर्वांनी पाळल्यास एक सुखी, समृद्ध आणि गौरव गरीमामय व विश्वगुरू भारत पुन्हा उभा राहील, यात शंका नाहीच व राष्ट्र परंवैभवाप्रत जाईल, हाच विश्वास आहे.राष्ट्रीय सण म्हणून हा दिवस नक्कीच साजरा करावा. जानेवारी आणि ध्वजारोहण आणि राजपथावरील भारताची आन बान शान असलेली परेड हे एक वेगळेच समीकरण आहे. एक भारतीय म्हणून हा गौरव सोहळा बघताना

प्रजासत्ताक दिन, राष्ट्रहित सर्वतोपरी !!अभिमान वाटावा, अशी ही परेड! प्रत्येक भारतीयाने एकदा तरी हा सोहळा प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवावा. खरंच, गर्व होतो आपण भारतीय असल्याचा.. आयुष्यात एकदा तरी जानेवारीची कवायत परेड बघायचीच. दिल्ली गाठायचीच. खरं तर रोजची लढाई, आपण सगळेच लढतो. पण लढायची शिस्त शिकवते, ती ही परेड! शिस्तीत जगायला शिकतो माणूस, ही परेड बघून! सगळे एक आहोत, सगळे सारखे आहोत. सगळ्यांना बरोबर घेऊन चाललात, की देश पुढे जाणार. सीमेवर लढणाऱ्यांची आठवण करून देते, ती ही परेड! कौतुकसोहळा तो देशाचा, तो चुकवायचा नाहीच. भारत माता की जय वंदे मातरम्।

संपर्क : ८६६८५४११८१

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४