शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

चाणक्यनीतीनुसार 'या' चार गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही शत्रूपासून सावध राहू शकता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 08:00 IST

आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्याला चिमणीप्रमाणे शिकवण देत असतात, परंतु आपणच प्रसंगाकडे डोळेझाक करतो आणि चुकांची पुनरावृत्ती करत राहतो.

आचार्य चाणक्य सांगतात, कोणावरही विश्वास ठेवावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. लोक तर म्हणतात, आपल्या सावलीवरही विश्वास ठेवू नका, कारण अंधारात तीसुद्धा आपली साथ सोडते, मग आपले म्हणवणाऱ्या लोकांची काय कथा! मात्र, वेळप्रसंगी आपण छोट्या पण महत्वाच्या गोष्टी विसरतो आणि घडलेल्या चुका वारंवार करतो. या चुका घडू नयेत म्हणून एका छोट्याशा चिमणीने राजाला अद्दल शिकवली. 

एका माळ्याने लावलेल्या बागेत एक चिमणी येऊन रोज नासधूस करत होती. त्याने खूप प्रयत्न केले, परंतु तो चिमणीवर नियंत्रण आणू शकला नाही. त्याने कंटाळून राजासमोर आपली व्यथा मांडली. प्रजेचे हित लक्षात घेता, राजाने माळ्याचे दु:खं दूर करण्यासाठी आपले सैनिक पाठवले. सैनिक बागेवर लक्ष ठेवू लागले. परंतु चिमणी त्यांच्या डोळ्यादेखत बागेचे नुकसान करत असलेले पाहून सैनिकांनी तलवारी उपसल्या. परंतु, त्यांच्या वारातून निसटत इवलीशी चिमणी निघून गेली. असे सलग चार पाच दिवस झाल्यावर चिमणी आपल्या तावडीत येत नसल्याचे सैनिकांनी राजाला सांगितले. शेवटी राजा बागेत पोहोचला. भल्या मोठ्या शत्रूंना खडे चारणारा योद्धा अशी ओळख असलेला राजा तलवार घेऊन एका बगिचात काय करतोय, हे बघायला गावकऱ्यांची गर्दी जमली. 

चिमणी रोजच्या वेळेत आली. या झाडावरून त्या झाडावर भिरभिरू लागली. राजाने तिला एक दोनदा तलवारीचा धाक दाखवला, पण ती बधली नाही. उलट जास्तच त्रास देऊ लागली. राजा रागारागाने तिच्या दिशेने धावला आणि साधारण तासभराच्या झटापटीनंतर चिमणी राजाच्या तावडीत सापडली. चिमणी घाबरली. माळी आनंदून गेला. सैनिकांचाही जीव भांड्यात पडला. राजा त्या चिमणीला मारणार, इतक्यात चिमणीने राजाकडे हात जोडत विनवणी केली. माफी मागितली आणि म्हणाली, `हे राजा, आज माझा मृत्यू निश्चित आहे याची मला कल्पना आहे. परंतु मृत्यूआधी मला तुम्हाला चार गोष्टी सांगाव्याशा वाटत आहेत. त्या कृपया ऐकून घ्या. कारण त्यात तुमचाच फायदा आहे.'

चिमणीने आधीच एवढा हैदोस घालून झाला होता, की ती आणखी क्षणभरही राजाला नजरेसमोर नको होती. तरीदेखील मृत्यूआधी प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाते. या न्यायाने चिमणीला मुठीत धरून राजा तिला म्हणाला, `जे सांगायचे आहे ते पटकन सांग!'

राजाचा राग पाहून भेदरलेली चिमणी सांगू लागली, `राजा, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शत्रूला कधीच हातातून निसटू देऊ नकोस. दुसरी गोष्ट असंभव गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. तिसरी गोष्ट भूतकाळाबद्दल कधीच मनात खंत बाळगू नकोस आणि चौथी गोष्ट म्हणजे...''ऐकतोय, पटकन सांग...चौथी गोष्ट कोणती?' राजा ओरडतच म्हणाला.

चिमणी म्हणाली, `राजा तू माझी मान एवढी आवटळून धरली आहेस की मला शब्दही फुटत नाहीयेत. तुझी पकड थोडीशी सैल कर, चौथी गोष्टही सांगते.'चौथी गोष्ट ऐकण्याच्या नादात राजाने मूठ सैल केली, तशी चिमणी भुर्रकन उडून झाडावर गेली आणि म्हणाली, 'कधीच कोणावर विश्वास ठेवू नकोस.'इवलुशी चिमणी डोळ्यादेखत उडून गेली पण आयुष्याचा मोठा पाठ शिकवून गेली. राजाने आपली तलवान म्यान केली आणि चिमणीला गुरुस्थानी मानून वंदन केले. चिमणीने पुन्हा कधी बागेची नासधूस करणार नाही असा शब्द दिला व राजाने माळ्याला नुकसान भरपाई देऊन त्याचा बगिचा पुनश्च फुलवला. 

आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्याला चिमणीप्रमाणे शिकवण देत असतात, परंतु आपणच प्रसंगाकडे डोळेझाक करतो आणि चुकांची पुनरावृत्ती करत राहतो. म्हणून पुढच्या वेळेस चिमणीने सांगितलेल्या चार गोष्टी लक्षात ठेवा आणि दर वेळी नवीन चूक करा, पण आधी घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती अजिबात नको!