शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मारुती रायाचा 'हा' श्लोक तोंडपाठ करून टाका आणि नैराश्य, भीतीला कायमचा रामराम म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 07:00 IST

स्तोत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते, जर मोठे स्तोत्र पाठ नसेल तर सुरुवात या दोन ओळींनी नक्कीच करता येईल!

शक्ती, भक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम हनुमंताच्या ठायी होता, म्हणून सकल संतांनी एकमुखाने त्याला भक्तश्रेष्ठ ही उपाधी दिली. कारण, ही उपाधी मिळूनही त्याच्याठायी अहंकाराचा लवलेश नव्हता, तर सदैव विनम्र भाव होता. या हनुमंताचे वर्णन करणारी अनेक स्तोत्र आपल्या परिचयाची आहेत. तरीदेखील दोन ओळीत त्याचे वर्णन करायचे झाले, तर समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्रातील श्लोकाचा आधार घेता येईल. 

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।

मनाचा वेग वाऱ्यापेक्षा जास्त आहे. ते घटकेत गल्ली ते दिल्ली एवढा वेगाने प्रवास करू शकते. अशा वेगवान मनावर ज्याने ताबा मिळवला. इंद्रियांना नियंत्रणात ठेवून जो जितेंद्र झाला. विद्वतचर्चेत भाग घेऊन ज्याने नम्रपणे आपले बुद्धिचातुर्य दाखवले. जो वानर सेनेचा नायक झाला आणि ज्याच्या ठायी प्रचंड सामर्थ्य असूनही ज्याने श्रीरामाचे दास्यत्व पत्करले त्या हनुमंताला आम्ही शरण जातो. 

आजच्या काळात सगळ्यात जास्त गरज आहे ती मन नियंत्रणात ठेवण्याची. मन चंचल असते ही बाब जरी खरी असली, तरी त्यावर योग्य वेळी नियंत्रण ठेवलेच पाहिजे अन्यथा मन वाहवत जाते आणि त्याचे परिणाम देहाला भोगावे लागू शकतात. यासाठीच मारुती रायाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणूनच हा श्लोक रोज अकरा वेळा म्हणावा. जेणेकरून त्या श्लोकाचा अर्थ उमजला तर मनाला उभारी येईल आणि इंद्रियांवर नियमन ठेवता येईल. 

या श्लोकातून बालमनावर योग्य संस्कार घालता येतात. हनुमंताचे चरित्र आजच्या तरुणांसाठी अतिशय आदर्श चरित्र आहे. मैत्री, प्रेम, भक्ती, दास्यत्व अशा सर्व बाबतीत त्याला तोड नाही. राम नाम घेत कमावलेले शरीर आणि जीवनाला दिलेली योग्य दिशा आपणही आचरणात आणण्यासारखी आहे. म्हणून केवळ भक्ती नाही, तर युक्ती आणि शक्तीचाही आदर्श घेऊन हनुमंताचे अनुकरण आपण केले पाहिजे. 

रामरक्षा पाठोपाठ मारुती स्तोत्र म्हणण्याची सवय आपल्याला बालपणापासूनच आहे. काही कारणाने ती सवय मोडली असेल, तरी हरकत नाही. रोज दहा मिनिटे इंटरनेटवर स्तोत्र लावून त्याबरोबर आपणही म्हणण्याचा सराव केला, तर कोणत्याही वयात ही स्तोत्र सहज पाठ होतील आणि जिभेला चांगले वळण लागेल. 

स्तोत्रपठणाला जोड द्या व्यायामाची. मारुती रायाने व्यायाम करून शरीर कमवले, मरगळ झटकली आणि राम कार्याला आयुष्य समर्पित केले. त्याचप्रमाणे आपणही आळस, अज्ञान झटकून उत्साहाने व्यायाम करूया, प्राणयाम करूया, मन, बुद्धी आणि शरीर शक्तिशाली बनवूया, ज्यामुळे भीती नैराश्य आपल्या आसपासही फिरकणार नाही!