शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

विष्णूभक्त नाकापासून कपाळापर्यंत उभे गंध का लावतात, त्यामागे आहे 'हे' कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:06 IST

शिवभक्त भस्मलेपन करतात आणि गंधाची आडवी बोटे कपाळावर उमटवतात, तर विष्णूभक्त गंधाची उभी बोटे उमटवतात. 

विष्णूभक्तांच्या कपाळावर आपण नेहमी उभे गंध पाहतो. हे गंध सामान्य गंधासारखे उभ्या रेषेत नसून इंग्रजीतील व्ही अक्षरासारखे असते. केवळ कपाळावर नाही, तर ते लोक आपल्या भुजांवर, छातीवर आणि पाठीवरदेखील असे गंध लावतात. पण का? त्याची ही सविस्तर माहिती...

हिंदू परंपरेनुसार कपाळ मोकळे ठेवणे अशुभ मानले जाते. कोणत्याही प्रकारचे असो, पण कपाळावर गंध लावणे हे संस्कृतीचे चिन्ह मानले जाते. तसेच कपाळावरील, दोन भुवयांच्या मध्य भागाचे ते पूजन असेही मानले जाते. शिवभक्त भस्मलेपन करतात आणि गंधाची आडवी बोटे कपाळावर उमटवतात, तर विष्णूभक्त गंधाची उभी बोटे उमटवतात. 

वैष्णव भक्तीत गंधलेपनासाठी गोपीचंदनच वापरले जाते.

गोपीचंदनाची उत्पत्ती कृष्णकथेत सापडते. कृष्णाच्या देहाला झालेला दाह गोपिकांच्या पायदळी तुडवल्या गेलेल्या मातीच्या लेपाने शांत झाला. तो लेप गोपीचंदन म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक फायदे पाहता आजही त्या विशिष्ट प्रकारच्या मातीपासून गोपीचंदनाची निर्मिती केली जाते. ही माती द्वारकेजवळच आढळते. भगवान गोपालकृष्णांनी कृष्णावतार समाप्त केला, तेव्हा गोपिकांनीदेखील यमुनेत आपला देह ठेवला. त्या नदीतटावरची माती गोपीचंदन बनवण्यासाठी वापरली जाते. कृष्णभक्तीचा अंश त्या मातीत मिसळलेला असल्यामुळे ती माती भाळी लावली जाते आणि आजही विष्णू भक्ती गोपीचंदनाचा तिलक आपल्या कपाळावर शोभेने मिरवतात. 

गोपीचंदन लावण्याची विष्णू भक्तांची वेगवळीच परंपरा आहे. ती म्हणजे दोन भुवयांच्या मध्यापासून कपाळाच्या शेवटापर्यंत ऊर्ध्वदिशेने चंदनलेपन केले जाते. ही त्यांची ओळख आहे. या खुणेवरून विष्णुभक्त ओळखता यावे, एवढीच त्यामागील सद्भावना. त्याचबरोबर दोन भुवयांमधील गंधलेपन आपल्याला सातत्याने विष्णुभक्तीचा आठव करून देते आणि आपला भालप्रदेश शीतल व शांत ठेवते. 

  • अनेक शास्त्रात वर्णन केल्यानुसार गोपीचंदन लावणाऱ्या व्यक्तीला मरणोत्तर वैकुंठधाम प्राप्त होते.
  • गोपीचंदन लावणारी व्यक्ती वाममार्गाकडे जात नाही. कारण कपाळावर लावलेले गंध वाईट विचारांपासून मनाला परावृत्त करते.
  • गोपीचंदन लावून कृष्णभक्ती किंवा विष्णूभक्ती करणाऱ्या भक्ताला राजसूय यज्ञाचे किंवा अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. 
  • गोपीचंदन लावणारी व्यक्ती सांसारिक सुखापासून अलिप्त होत पारमार्थिक सुखाची अनुभुती घेते. 
  • वैष्णव सांप्रदायाने परदेशातील लोकांनाही विष्णू भक्तीची गोडी लावल्याचे दिसते. हरे राम हरे कृष्णा या संस्थेअंतर्गत कृष्ण भक्तीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार होत असल्याचे दिसून येते.