शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी नियमीत वाचा सिद्ध कुंजिका स्तोत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 12:28 IST

श्री दुर्गा सप्तशती पैकी हा असाच एक पाठ आहे , ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.  हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही.

दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अतिशय प्रासादिक आहे. दर नवरात्रीत या ग्रंथांचे भक्तिभावाने वाचन केले जाते. या ग्रंथांतील प्रत्येक श्लोक, मंत्र अत्यंत फलदायी आहे. केवळ देवीच्या ठायी निस्सीम भक्तिभाव असायला हवा. संपूर्ण ग्रंथाचे पारायण शक्य नसेल, तर त्यातले कुंजिका स्तोत्र म्हणावे. असे म्हणतात, की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाहीत, ते केवळ कुंजिका स्तोत्र पठण करतील, तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते . आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग,  संकटे, दु:ख, रोगराई व शत्रूंचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे. शिवाय अन्य दिवशीही या स्तोत्र पठणाचा संकल्प सोडता येतो. याबाबत संजय कुलकर्णी लिहितात-

'कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात, दिवसात  पठण करता येते. परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केले जाते. साधकाने  सकाळी स्नानविधी करून, मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटो फ्रेमसमोर बसून प्रथम साधी पूजा करावी. आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा आणि देवीला नैवेद्य अर्पण करावा. यानंतर अक्षता,पुष्प, एक रुपयाचा नाणे तुमच्या उजव्या हातात ठेवावे आणि नवरात्रातील नऊ दिवस संयम-नियमाने कुंजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करावा. नंतर जमिनीवर पळीने पाणी  सोडून पठण सुरू करावे. हा संकल्प पहिल्या दिवशी एकदाच करावा यानंतर, दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा.

कुंजिका स्तोत्रांचे फायदे

धनलाभासाठी : ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते. सतत आर्थिक नुकसान होत आहे.  अनावश्यकपणे पैसे खर्च करणार्‍याना कुंजिका स्तोत्रांच्या वाचनाचा फायदा मिळतो. संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात.  पैशाचा संग्रह वाढतो.शत्रुमुक्ती : हे स्तोत्र शत्रूंपासून मुक्ती मिळविण्यासाठी आणि केसेस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाहीत. कोर्ट कचेरी,  खटले जिंकले जाऊ शकतात.रोग मुक्तता: दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ  जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो.  कुंजिका स्तोत्रांच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारांपासून तर मुक्ती मिळतेच आणि  रोगांवरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकता.कर्जमुक्ती : जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर  कर्ज घेणे हे चक्रच जाणू चालू असेल आणि त्याला  छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी ही कर्ज घ्यावयास लागत असल्यास, कुंजिका स्तोत्रांचे नियमित पठण त्याने केल्यास कर्ज मुक्ती लवकरच होईल.सुखद वैवाहिक जीवन : विवाहित जीवनात  नियमित सुख कायम राहण्यास कुंजिका स्तोत्रांचे नियमित पठण केले पाहिजे. एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढविण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते.

खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

दुर्गा देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची आहे. नवरात्रीसाधना दरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. वाईट कृत्ये आणि वाईट भाषा वापरू नका. यामुळे उलटे फळही मिळू  शकते. कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा,एखाद्याच्या नाशासाठी, एखाद्या वाईट कामानेसाठी हा जप आणि पठण करू नये. याचा उलट परिणाम वाचकांवर होऊ शकतो. संकल्प केल्यास या वेळी मांस किंवा मद्यपान करू नका. 

श्री दुर्गा सप्तशती पैकी हा असाच एक पाठ आहे , ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.  हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही. या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे. जर वेळ कमी असेल तर आपण श्रीदुर्ग सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठण करून पुण्य मिळवू शकता.नावानुसार ती सिद्ध कुंजिका आहे. जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही, समस्या सोडविली जात नाही, तेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा. भगवती तुमचे  रक्षण करील.

सिद्ध कुंजिका स्तोत्रांचा महिमाभगवान शंकर म्हणतात की, सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करण्यासाठी देवी कवच, अर्गाला, कीलक, रहस्य, सूक्त, ध्यान, न्यास  आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही,  केवळ कुंजिका पठण केल्याने दुर्गा पाठाचे फळ प्राप्त होते.

या स्तोत्राचे पठण पुढीलप्रमाणे करावे. 

  • ज्ञान मिळविण्यासाठी पाच पाठ वाचना पूर्वी (अक्षता घ्या आणि पुस्तकांमध्ये ठेवा)
  • यश-कीर्तीसाठी पाच पाठ (देवीला अर्पण केलेली लाल फुले पाठानंतर घ्या आणि त्यांना सेफ मध्ये  ठेवा.)
  • संपत्ती मिळवण्यासाठी नऊ पाठ (पांढर्‍या तिळाने संकल्पित करा )
  • घराच्या सुख  आणि शांतीसाठी तीन पाठ  (देवीला गोड पान अर्पण करा)
  • आरोग्यासाठी तीन पाठ  (दर  रोज  पठण केल्यास काही दिवसांनी आराम मिळेल)
  • शत्रूपासून रक्षण करण्यासाठी ३,७ किंवा ११ पाठ  (सतत पठण केल्यास आराम मिळेल)
  • रोजगारासाठी ३,५,७ आणि ११ (पर्यायी) (एक सुपारी देवी अर्पित करून मग आपल्याकडे ठेवा)