शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Navami 2022: स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेमासह परमार्थिक मार्गाची कालातीत दिशा देणारे समर्थ रामदास स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 21:25 IST

Ramdas Navami 2022: रामदास नवमीच्या निमित्ताने समर्थांच्या विस्तृत आणि व्यापक चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा...

प्रभू श्रीराम आणि हनुमंतांना आपले उपास्य दैवत मानून, जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।, अशी शिकवण देत परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेमासह प्रापंचिक ज्ञान आणि परमार्थिक मार्गाची दिशा अधिकार वाणीने देणाऱ्या समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) यांची श्री रामदास नवमी भक्तिभावाने साजरी केली जाते. माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या तिथीला रामदास नवमी (Ramdas Navami 2022) असे संबोधले जाते. यंदाच्या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी रामदास नवमी आहे. यानिमित्ताने समर्थांच्या विस्तृत आणि व्यापक चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा...

समर्थ रामदास स्वामींच्या वडील सूर्याजीपंत ठोसर निस्सीम सूर्योपासक होते. गंगाधर व नारायण या दोन पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. समर्थ रामदास स्वामींचा जन्म रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस झाला. नारायण लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे, असा त्याचा बाणा असायचा. नारायणाने मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. रामदास स्वामींच्या बालपणाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा नारायण लपून बसला. काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. काय करीत होता, असे विचारल्यावर, आई, चिंता करितो विश्वाची, असे उत्तर त्याने दिले होते.

तपश्चर्येनंतर १२ वर्षे भारतभ्रमण

या मुलाचा विवाह करण्याचा घाट कुटुंबियांनी घातला. मात्र, बोहोल्यावर उभे असताना सावधान शब्द ऐकताच ते नेसत्या वस्त्रानिशी मंडपातून पळून गेले. यानंतर त्यांनी पंचवटी येथे जाऊन रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून ते दररोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला, असे सांगितले जाते. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. तपश्चर्या संपल्यानंतर समर्थांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. सारा हिंदुस्थान पालथा घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थांनी सर्वतोपरी मदत

वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परत आले. १२ वर्षाच्या प्रवासांत रामदास स्वामींनी जे पाहिले, ते भयंकर होते. सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरेल. समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली. तेव्हा रामदास स्वामींनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना उपदेश केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणारे रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याने भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थांनी सर्वतोपरी मदत केली.

समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य

समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. रामदास स्वामींची उपदेशाची भाषा अत्यंत साधी व सोपी होती. रामदास स्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे, हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध, अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, परमार्थाशिवाय केलेला प्रपंच उपयोगाचा नाही. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे, असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात, असे त्यांनी सांगितले आहे. 

समर्थांचे साहित्य व काव्यनिर्मिती

समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी अफाट, विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र,अनेक आरत्या उदाहरणार्थ, सुखकर्ता दुखहर्ता, ही गणपतीची आरती, लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा, ही शंकराची आरती, अशा त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. याशिवाय रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, अनेकविध अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्‌रिपु-विवेक आदी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे.  

माघ वद्य नवमीला समाधीस्त

समर्थांनी शिवाजी महाराजांच्या काळात समर्थसंप्रदाय स्थापन करून १,१०० मठ स्थापन केले. सुमारे १,४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. माघ वद्य नवमीला तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ' हा घोष करून समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. हीच तिथी पुढे श्रीरामदास नवमी म्हणून प्रसिद्ध झाली. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक