शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

Ram Navami 2024: राजा दशरथाच्या बाबतीत असे काही घडले की रडता रडता त्याला आनंद झाला; त्या क्षणाबद्दल... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 16:03 IST

Ram Navami 2024: रामायणातील प्रत्येक पात्र आपल्याला काय बोध देते, हे राम नवमीनिमित्त सुरु केलेल्या मालिकेतून जाणून घेऊया. 

>> डॉ. भूषण फडके

ब्रह्मदेवांच्या आणि देवर्षी नारदांच्या आज्ञेप्रमाणे महर्षी वाल्मिकींनी रामचरित्र लेखनास सुरुवात केली. सत्यप्रिय रामांनी केलेले सर्व कार्य वाल्मिकींना दिसू लागले. अयोध्येत रावण वधानंतर प्रभू रामांनी सीतेचा त्याग केला. ती महर्षी वाल्मिकींच्याच आश्रमात आली. तीला जुळी मुलं झाली तीच लव-कुश. महर्षींनी दोन्ही राजकुमारांना अस्त्र-शस्त्र विद्या, राजविद्या, गायनकलेत प्रवीण केले.

अयोध्येत प्रभू रामांनी अश्वमेध यज्ञ आरंभिला. महर्षी वाल्मिकीही  लव-कुश समवेत यज्ञमंडपात आले आणि  त्यांनी रामचरित्र गायनास सुरुवात केली. कानात प्राण आणून मंत्रमुग्ध होऊन सभा लव-कुशाच्या तोंडून श्रीरामचरित्र ऐकण्यात गुंग होती. आता लव-कुशांनी अयोध्यानगरीच्या वर्णनाला सुरुवात केली.

पवित्र शरयू नदीच्या तिरावरचा कोशल देश आणि याच देशातील समृद्ध सुखी असे अयोध्यानगर. या नगरीचा प्रजाहितदक्ष, वेदवत्ता आणि धर्मवत्ता राजा ''दशरथ''.  दशरथाला कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी या तीन राण्या होत्या.. दशरथाचे प्रजेवर पुत्रवत प्रेम होते पण राजाला पुत्रसुख नव्हते याचे राजा आणि प्रजाजनांना दु:ख होते.

दशरथ राजा उत्तम धनुर्धर होते. शब्दवेधी बाण मारण्यात त्यांच्याइतका तरबेज त्याकाळी दुसरा कोणीही नव्हता. पुत्र नसल्याचे दु:ख हलके करण्यासाठी राजा मृगया करण्यासाठी जंगलात जात असे. एकदा दिवसभर प्रयत्न करूनही राजाला शिकार गवसली नाही. संध्याकाळ संपली , रात्र झाली राजा झाडावर बसला. एखादं श्वापद येईल आणि शब्दवेधी बाणांनी मी त्याला मारीन रात्री पाणवठ्यावर आवाज झाला. आवाजाच्या दिशेनी राजाने शब्दवेधी बाण मारला पण, ''मेलो, मेलो'' अशा आरोळीने राजा खाली उतरून पाहतो तो मुनीकुमार रक्ताच्या थारोळ्यात!

राजा दशरथ सत्यनिष्ठ आहे म्हणून बाण लागल्यावर तो उतरून चौकशी करतो नंतर श्रावणाच्या छातीतील बाण काढतो. मुनिकुमाराचा मृत्यू होतो.राजा  पाणी घेऊन त्याच्या वृद्ध माता-पित्यांकडे जातो. त्याचे माता-पिता दशरथाला शाप देतात. ''पुत्रवियोगाने तुलाही मृत्यू येईल.'' वृद्ध माता-पिता श्रावण-श्रावण करत प्राण सोडतात.

राजा तिघांचेही अंत्यसंस्कार करून राजप्रासादात येतो. पोटी पुत्र नाही त्यात एक शाप. राजाच्या चेहऱ्यावरील ताण वशिष्ठ ओळखतात आणि दु:खाचे कारण विचारतात. राजाकडून हकीगत कळताच वशिष्ठ ऋषी म्हणतात, ''राजा, हा शाप नसून तुझ्यासाठी वरदान आहे. अरे, मृत्युसमयी तुझ्याजवळ पुत्र राहणार नाही म्हणजेच तुला पुत्रसुख आहे हे निश्चितच''. श्रावण कुमारच्या आई वडिलांच्या शापातून वेगळा अर्थ घेणाऱ्या वशिष्ठ ऋषींचा दृष्टीकोन योग्य आहे. !” वाईटातून चांगल घेण्याची वशिष्ठांची योग्यता यातून दिसून येते. आपण आजकाल +ve attitude म्हणतो ते हेच. हेच आपल्याला रामायणातून शिकायचे आहे. रामायणातील प्रसंग जीवनोपयोगी शिकवण देतात, म्हणूनच रामायणाचा डोळसपणे अभ्यास होणे आवश्यक आहे.

ऋषश्रुंग ऋषींना पुत्रकामेष्टी यज्ञासाठी सन्मानाने बोलविण्यात येते. यज्ञ सफल होतो  आणि चैत्र महिन्यात शुद्ध नवमीला माध्यान्ह समयी कौसल्येला राम, सुमित्रेस लक्ष्मण-शत्रुघ्न तर कैकयीला भरत असे चार पुत्र होतात. रामाचा जन्म दुपारी का झाला? कारण लोकांच्या जीवनातील उन्हाळा (दाह) संपविण्यासाठी.  अयोध्येची जनता राम जन्माने आनंदित झाली.

भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८

Email-bmphadke@gmail.com

Ramayan 2024: एवढी वर्षं लोटूनही अजून का टिकून आहे रामकथेची जोडी? वाचा ९ दिवसीय मालिका!

 

टॅग्स :ramayanरामायण