शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Rakshabandhan 2022 Bhadra Kaal: शनिदेवाची बहीण आहे भद्रा; जाणून घ्या, कशामुळे देते अशुभ फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 22:11 IST

भद्रा काळात ना राखी बांधायली जाते, ना पूजा-अर्चा केली जाते, ना नवीन कामे, गृह प्रवेश आदी केले जाते. महत्वाचे म्हणजे, भद्रा काळात करण्यात आलेली शुभ कामेही अशुभ फळ देतात, असे मानले जाते. 

हिंदू धर्मात रक्षाबंधन उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या उत्सवाच्या दिवशीच भद्रा काळ आला आहे. सामान्य मान्यतेनुसार, भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. भद्रा काळात ना राखी बांधायली जाते, ना पूजा-अर्चा केली जाते, ना नवीन कामे, गृह प्रवेश आदी केले जाते. महत्वाचे म्हणजे, भद्रा काळात करण्यात आलेली शुभ कामेही अशुभ फळ देतात, असे मानले जाते. 

भद्रा ही सूर्य देव आणि त्यांची पत्‍नी छाया यांची मुलगी आहे. याच बोरोबर ती शिनीदेवाची सख्खी बहिनही आहे. ज्या प्रकारे शनिदेवांचा स्वभाव कडक मानला जातो. त्याच प्रकारे त्यांची बहीण भद्रा हिचा स्वभावही कडक मानला जातो. पौराणिक कथेनुसार भद्रा ही अतिशय कुरूप असून, ती लहानपणापासूनच ऋषी-मुनींचे यज्ञ आणि अनुष्ठानांत अडथळे आणत होती. 

यामुळे, अखेर सूर्य देवांनी चिंतित होऊन ब्रह्माजींकडे सल्ला मागीतला. तेव्हा ब्रह्माजींनी भद्राच्या उद्धटपणावर नियंत्रणात आणण्यासाठी पंचांगाचे एक मुख्य अंग असलेल्या विष्‍टी करणमध्ये तिला स्थान दिले. याच बरोबर, आता जे कुणी तुझ्या काळात काही शुभ काम करेल, त्यात तू विध्‍न आण, असे सांगितले. तेव्हापासूनच भद्रा काळात कुठल्याही प्रकारचे शुभ काम केले जात नाही. 

भद्रा काळात राखीही बांधत नाहीत -  गृह प्रवेश, नव्या कामांना सुरुवात करणे, पूजा-अनुष्‍ठान आदींशिवाय भद्रा काळात राखीही बांधली जात नाही. पौराणिक कथेनुसार, रावणाच्या बहिणिने त्याला भद्रा काळातच राखी बांधली होती आणि यानंतर, एका वर्षाच्या आतच भगवान रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. यामुळे, भद्रा काळात राखीदेखील बांधली जात नाही, असे मानले जाते.(टीप : येथे देण्यात आलेली माहिती ही सर्व सामान्य मान्यतांवर आणि माहितीवर आधारित आहे. लोकमत याची पुष्टी कत नाही.)

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन