शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

खरंच मी अंतर्यामी सुखी आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 10:49 IST

मत्तेय नावाचे फें्रच शास्त्रज्ञ आहेत. यशस्वी शास्त्रज्ञ अशा उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना एकेदिवशी त्यांना साक्षात्कार झाला.

- फा. फ्रान्सिस दिब्रिटोजन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची एकच धडपड असते ती सुखी असण्यासाठी! ‘सुख पाहता जवा एवढे, दु:ख पर्वता एवढे,’ असे संत तुकोबा म्हणतात ते अगदी खरे आहे. चित्तवृत्ती प्रसन्न असणे, यातच खरे सुख सामावलेले आहे. मत्तेय नावाचे फें्रच शास्त्रज्ञ आहेत. यशस्वी शास्त्रज्ञ अशा उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना एकेदिवशी त्यांना साक्षात्कार झाला. ‘हे सारं मला कुठे घेऊन जाणार आहे? खरंच मी अंतर्यामी सुखी आहे का?’ या सुखाचा शोध घेत घेत ते थेट तिबेटला पोहोचले. बौद्ध भिक्षू झाले. इतकेच नाही तर मठाधिपती झाले. सुख म्हणजे आत्मशोध यावर त्यांनी विचार व्यक्त केले. सुखाचा शोध लागत नाही, तोपर्यंत माणूस अस्वस्थ असतो. सुख म्हणजे निरासक्त अवस्थेला पोहोचणे, निरपेक्ष होणे. कारण दु:खाचा उगम अपेक्षेतून होतो, असे बुद्धाने म्हटले आहे. माणूस निरासक्त अवस्थेला पोहोचतो तेव्हा तो अंतर्यामी आनंदी होतो. शरीर, इंद्रियांना मिळते ते सुख व मनाला होतो तो आनंद! सुख शरीराला आनंद देते तर आनंद मनाला चिरकाळ सुख देतो. आपण आनंदापेक्षा सुखाच्या मागे असतो. ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे,’ अशी आपली अवस्था होते. प्रार्थनेतही आपण सुखाची मागणी करतो आनंदाची नाही. एक ग्रीक योगी थंडीच्या दिवसात ऊन खात बसला होता. इतक्यात तेथे राजा आला व त्याला म्हणाला, ‘साधुमहाराज, तुम्ही हवं ते मागा मी देईन.’ तेव्हा हात जोडून योगी विनम्रपणे म्हणाला, ‘महाराज, तुम्ही जरा बाजूला सरकलात तर बरे होईल. तुमच्यामुळे माझं ऊन अडलं आहे.’ योग्याचा आनंद त्यात होता. माणसे सेवानिवृत्त होतात; पण आसक्तीतून निवृत्त होत नाहीत. वानप्रस्थाश्रमात वनामध्ये प्रस्थान करायचे असते. म्हणजे निसर्गाकडे वळायचे असते. गरजा कमी करून प्रपंचातून निरासक्त व्हायचे असते; पण आज किती लोक या अवस्थेला पोहोचले आहेत? आनंद हे आपल्या जगण्याचं अंतिम ध्येय असायला हवे. अध्यात्मामध्ये परमेश्वराला सत् चित् आनंद म्हटले आहे, हेच जीवनाचे खरे सार आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक