शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Prabodhini Ekadashi 2024: प्रबोधिनी एकादशीपासून सलग २१ दिवस करा 'ही' उपासना आणि लाभ मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 10:23 IST

Praboadhini Ekadashi 2024: चतुर्मासात झोपी गेलेले श्रीहरी प्रबोधिनी एकादशीला जागे होतात, म्हणून तेव्हापासून २१ दिवस केलेली उपासना प्रभावी ठरते!

यंदा १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2024) आहे, तिला आपण प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi 2024) म्हणतो. तसेच या दिवशी चातुर्मासात झोपी गेलेले श्रीहरि विष्णु आपली योगनिद्रा संपवून जागे होतात म्हणून या एकादशीला देवउठणी एकादशी असेही म्हणतात. वास्तविक पाहता देव कधीच झोपत नाहीत, पण त्यांना विश्रांति मिळावी म्हणून भक्तांनी नेमून दिलेला हा काळ! नव्हे तर भक्तांचा भोळा भाव! त्यानुसार विष्णु उपासनेच्या दृष्टीने दिलेले स्तोत्र पठण सलग २१ दिवस करा आणि अनुभव घ्या!

व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात. मात्र अनेक भाविकांनी इच्छापूर्तीचा, देव दर्शनाचा, संत दर्शनाचा अनुभव कथन केल्यामुळे व्यंकटेश स्तोत्राबद्दल लोकांच्या मनात अधिक जाणून घेण्याबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे. त्यासाठीच या स्तोत्राची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे-

१) एक मंडल म्हणजे २१ वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे.

२) हे स्तोत्र २१ दिवस (कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो), रोज अर्धरात्री १२.०० वाजता (शुचिर्भुत होउन), म्हणायला सुरुवात करावी, संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, पण सुरु मात्र ठीक १२ वाजता रात्री करावे.  

३) ह्या २१ दिवसांत ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या, जसे की, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार्-वर्तन्-वचन, कोणावर अन्याय. मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य!

४) रोज रात्री हे स्तोत्र म्हणतांना पूर्वेकडे तोंड करुन निळ्या, आसनावर मांडी घालुन बसावे. 

५)  इकडे-तिकडे न पाहाता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे. 

६) २१दिवस पूर्ण झाल्यावर जे काही ईच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा या अनेकांचा अनुभव आहे. 

७ ) २१ दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा. मोजून तीन मिनिटांचे हे स्तोत्र आहे. तेवढा वेळ अवश्य काढा कारण ग्रहपीडा निवारण, संकटनिवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. 

 श्री व्यंकटेश स्तोत्र

व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नोऽमितविक्रमः।संकर्षणो अनिरुद्धश्र्च शेषाद्रिपतिरेवचः ॥१॥जनार्दनः पद्मनामो वेंकटाचलवासिनः ।सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः॥२॥गोविंदो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः ।वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः ॥३॥श्रीधरः पुंडरिकाक्षः सर्वदेवस्तुतो हरीः ।श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः ॥४॥रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः ।चोलपुत्रप्रियः शांतो ब्रह्मादिनां वरप्रदः ॥५॥श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद् भयनाशनः ।श्रीरामो रामभद्रश्च भवबंधैकमोचकः ॥६॥भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः अच्युतानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायकः ॥७॥सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं ।समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः ॥८॥इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः ।त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते ॥९॥राजद्वारे पठेद् घोरे संग्रामे रिपुसंकटे ।भूत-सर्प-पिशाचादि भयं नास्ति कदाचन ॥१०॥अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान्भवेत् । रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् ॥११॥यद् यदिष्टतमं लोके तत् तत् प्राप्नोत्यसंशयः ।ऐश्वर्यं राजसंन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदम् ॥१२॥विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं ।सर्वऐश्वर्यप्रदं नृणां सर्वमंगलकारकम् ॥१३॥मायावी परमानंद त्यक्त्वा वैकूठमुत्तमं ।स्वामिपुष्करिणीतीरे रमया सह मोदते ॥१४॥कल्याणाद्भूत गात्राय कामितार्थप्रदायिने ।श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः ॥१५॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४