शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारी पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ५ गोष्टी अर्पण करा, गणपती प्रसन्न होईल, कालातीत लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 09:09 IST

Pitru Paksha Sankashti Chaturthi 2025 Budhwar Ganpati Pujan: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी बुधवारी येत असून, या दिवशी केलेले गणपती पूजन विशेष मानले गेले आहे. नेमके काय करावे? जाणून घ्या...

Pitru Paksha Sankashti Chaturthi 2025 Budhwar Ganpati Pujan: ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिःसीदसादनम्॥ प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात येणारी संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. ही संकष्टी चतुर्थी बुधवारी येत असून, या दिवशी केलेले गणपती पूजन विशेष मानले गेले आहे. 

पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील

बुधवारी, १० सप्टेंबर २०२५ रोजी संकष्टी चतुर्थी आहे. विशेष म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुद्ध विनायक चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीही बुधवारीच आली होती. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात, नवीन कामाचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने, स्मरणाने केला जातो. 

पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार

पितृपक्षातील भाद्रपद वद्य संकष्ट चतुर्थी

गणपतीचे नुसते नामस्मरण केले तरी वातावरण अगदी प्रफुल्लित, चैतन्यमयी होते. सर्व संकटे, समस्या, अडचणी, विघ्न दूर होणार, असा विश्वास पक्का होतो. विघ्नहर्ता गणपती अबालवृद्धांचे लाडके दैवत. गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात, जड अंतःकरणाने अनंत चतुर्दशीला निरोप दिला जाते. यानंतर सुरू होणाऱ्या पितृपक्षात येणारी संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. कारण, पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. यंदा अनंत चतुर्दशी, भाद्रपद पौर्णिमेला मृत्यू पंचक लागले. या मृत्यू पंचकाचे विघ्न संकष्ट चतुर्थीला दूर होणार आहे. विघ्नहर्ता कृपेने शुभ होऊ शकते, असे सांगितले जात आहे. 

सर्वोच्च सर्वश्रेष्ठ संकष्ट चतुर्थी, विघ्नहर्ता लवकर शुभफल देतो

गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने केले जाते. यातून या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. या व्रताचरणामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, असे मानतात. धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामुळे चातुर्मासातील पहिल्या आषाढ चतुर्थीला इच्छा असूनही व्रताचरण करता येईलच असे नाही. त्यामुळे या दिवशी बाकी काही जमले नाही, तरी गणपती बाप्पाला एक गोष्ट आवर्जुन अर्पण करावी, असे सांगितले जाते. 

पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!

बुधवारी गणेश पूजनाचे विशेष महत्त्व

महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते, हे सर्वश्रुत आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो, असे मानले जाते. 

बुधवारी दुर्वा, गोड नैवेद्य अवश्य अर्पण करा

गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वदाचे एखादे फूल वाहावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते शुभ लाभदायक ठरू शकते. तसेच गणपतीचा ‘ॐ गं  गणपतये नम:’ हा मंत्र १०८ वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा. बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

बुधवारी बाप्पा पूजनासह करा बुध ग्रहाशी संबंधित उपाय

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल, तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. बुध हा सौम्य व कलाप्रेमी ग्रह आहे. बुद्धी, ज्ञान, शिक्षण, तत्वज्ञान, अध्यात्मिक ज्ञान, धार्मिक अभ्यास आणि शिक्षण यांचा कारक मानल्या गेलेल्या बुधाचे मंत्र लाभदायक ठरतात. ॥ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः॥, ॥ ॐ बुं बुधाय नम:॥, हे बुधाचे बीज मंत्र आहेत. तर, ॥ प्रियंगु कलिका श्यामं रूपेणाप्रतिमं बुधम। सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्॥, हा बुधाचा नवग्रह स्तोत्रामधील मंत्र आहे. याशिवाय, ॥ॐ सौम्य-रूपाय विद्महे वाणेशाय धीमहि तन्नो सौम्यः प्रचोदयात् ॥, हा बुधाचा गायत्री मंत्र आहे. कुंडलीत बुध कमकुवत असेल तर प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. बुधवारचे व्रत करावे. हिरव्या रंगांचा समावेश असलेल्या वस्तू तसेच बुधाशी संबंधित असलेल्या वस्तूंचे दान करावे. 

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीpitru pakshaपितृपक्षchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक