शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 11:43 IST

Pitru Paksha Chaturdashi Shraddha 2024: पितृपक्षात चतुर्दशी ठराविक अशाच पितरांचे श्राद्ध करावे, असे सांगितले जाते. मग चतुर्दशीला निधन पावलेल्यांचे श्राद्ध विधी कधी करावेत? जाणून घ्या...

Pitru Paksha Chaturdashi Shraddha 2024:पितृपक्ष आता सांगतेकडे जात आहे. चातुर्मासात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. यांचे महात्म्य आणि महत्त्व वेगळे आणि अनन्य साधारण आहे. चातुर्मासात येणाऱ्या पितृपक्षाचे महत्त्वही विशेष मानले गेले आहे. यंदाचा पितृपक्ष कालसर्प ग्रहण योगात असल्याचे सांगितले जात आहे. पितृपक्षात चतुर्दशी तिथीला केल्या जाणाऱ्या श्राद्धाचे महत्त्व वेगळे आहे. कधी आहे चतुर्दशी श्राद्ध, कोणत्या पितरांचे श्राद्ध, तर्पण विधी केले जातात? जाणून घेऊया...

पितृपक्षाचा प्रारंभ चंद्रग्रहण होते, तर सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण असणार आहे. पितृपक्षात पंचमी, अष्टमी, नवमी या तिथींप्रमाणे चतुर्दशी तिथीला विशेष महत्त्व असल्याचे शास्त्रांत नमूद करण्यात आले आहे. कुटुंबातील मृत व्यक्तींचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्याचा हा कालावधी. भाद्रपद वद्य पक्षातील पितृपक्ष पंधरवड्यात अनेक तिथींना महत्त्व आहे. मात्र, चतुर्दशी तिथी एका वेगळ्या कारणासाठी विशेष आणि महत्त्वाची ठरते.

भाद्रपद वद्य चतुर्दशी: ०१ ऑक्टोबर २०२४

भाद्रपद वद्य चतुर्दशी प्रारंभ: ३० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०७ वाजून ०५ मिनिटे.

भाद्रपद वद्य चतुर्दशी समाप्ती: ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे.

भारतीय पंचांगात सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे चतुर्दशीचे श्राद्ध मंगळवार, ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी करावे, असे सांगितले जाते. गया, बद्रीनाथ यांसारख्या ठिकाणी अकाली मृत्यू आलेल्या व्यक्तींच्या नावाने केलेले श्राद्ध कार्य शुभलाभदायक आणि पुण्याचे ठरते, असे सांगितले जाते.

चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का?

चतुर्दशी तिथीला केवळ अनैसर्गिकरित्या मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करावा, असे शास्त्र सांगते. महाभारतातील अनुशासन पर्व आणि कूर्म पुराण या ग्रथांमध्ये याबाबत उल्लेख आल्याचे सांगितले जाते. भाद्रपद वद्य चतुर्दशीला केवळ आणि केवळ शस्त्राने, सर्पदंश, आत्महत्या, अपघाती मृत्यू, विषबाधा यांसारख्या अकाली मृत्यू म्हणजचे अनैसर्गिकरित्या मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करावेत, असे शास्त्र सांगते.

अकाली मृत्यू आल्यामुळे अनेक इच्छा अपूर्ण राहतात

अन्य सामान्यपणे निधन झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध कार्य हे त्या त्या तिथीला करावयाचे असते. मात्र, अनैसर्गिकरित्या मृत्यू आलेल्या व्यक्तींचे श्राद्ध करण्यासाठी चतुर्दशीचा दिवस राखून ठेवण्यात आले आहे. एखाद्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अकाली किंवा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या नावाने विशेष श्राद्ध तर्पण विधी करावेत. एक नमूद करण्याची गोष्ट म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचे अनैसर्गिकरित्या निधन कोणत्याही तिथीला झाले असले, तरी त्यांच्या नावाने करावयाचे श्राद्ध कार्य हे केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे, असे शास्त्र सांगते. अकाली मृत्यू आल्यामुळे अशा व्यक्तींच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. अशा पूर्वजांचा आत्मा पितृलोकांत जात नाही, असे मानले जाते. अशा पूर्वजांच्या आत्म्याला गती मिळावी, यासाठी विशेष श्राद्ध तर्पण विधी करावेत. याशिवाय वस्तूंचे दानही यथायोग्य, यथाशक्ती करावे, असे सांगितले जाते.

मग चतुर्दशीला निधन झालेल्यांचे श्राद्ध कधी करावे?

कुटुंबातील ज्या व्यक्तींचे निधन चतुर्दशी तिथीला झाले आहे, त्यांच्या नावाने सर्वपित्री अमावास्या तिथीला श्राद्ध कार्य करावे, असे सांगितले जाते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन शुद्ध किंवा वद्य चतुर्दशी तिथीला नैसर्गिकरित्या म्हणजे सामान्यपणे झाले असेल, तर अशा पूर्वजांचे श्राद्ध कार्य चतुर्दशी तिथीला न करता सर्वपित्री अमावास्येला करावे, असे शास्त्र सांगते.

 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास