शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

Pitru Paksha 2024: लक्षात ठेवा! 'या' पाच चुका करत असाल तर पिंडाला कधीही शिवणार नाही कावळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:24 IST

Pitru Paksha 2024: आजपासून पितृ पंधरवडा सुरू झाला, दरम्यान श्राद्धविधी करालच, मात्र सोबतच दिलेल्या चुका टाळा तरच होईल लाभ!

सनातन धर्मातील १८ महापुराणांपैकी गरुड पुराण एक आहे. यामध्ये मानवजातीच्या कल्याणाशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. यासह, व्यक्तीचे पाप-पुण्य, अलिप्तपणा, मृत्यू, मृत्यू नंतरचे जीवन इत्यादी बाबत तपशीलवार माहिती दिली गेली आहे. हिंदू धर्मानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी गरुड पुराणाचे पठण केले जाते, जेणेकरून मेलेल्या माणसाला सद्गतीप्राप्त होते. त्याने जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे. गरुड पुराण मृत्यू नंतर मोक्षाचा मार्ग दाखवते. पितृ पक्षात गरुड पुराणाचे वाचन केले जाते. त्यात म्हटल्यानुसार केवळ श्राद्धविधी केल्यानेच पितरांचा आत्मा तृप्त होतो असे नाही, तर व्यक्ति हयात असतानादेखील काही चुका टाळल्या तरच गेलेली व्यक्ति संतुष्ट होऊन या काळात आशीर्वाद देऊन जाते. म्हणून श्राद्धविधी बरोबरच दिलेल्या गोष्टींचे पालन करा.  

गरुड पुराणात, भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्यातील संभाषणाद्वारे लोकांना भक्ती, पुण्य, त्याग, तपश्चर्या, वैराग्य इत्यादी बद्दल सांगितले गेले आहे. मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे काय होईल हेदेखील यात म्हटले आहे. यासाठी, त्याचे कर्म जबाबदार कसे असेल आणि त्या व्यक्तीने काय टाळले पाहिजे याचीही माहिती दिली आहे. पैकी पाच गोष्टी, ज्या मनुष्याने कधीही करू नयेत, अन्यथा मृत व्यक्तीचा आत्मा पिंडाला शिवत नाही आणि पिंडदान करणार्‍याला आशीर्वादही देत नाही. 

इतरांचा अपमान करणे - तलवारीने केलेले घाव एकवेळ भरले,जातील  परंतु शब्दाने केलेले घाव कधीच भरले जात नाहीत. म्हणून अजाणतेपणी कोणाचाही अपमान करु नका. यामुळे, समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि त्याचा परिणाम अपमान करणाऱ्या व्यक्तीला सहन करावा लागतो. सर्वांशी चांगले वर्तन ठेवा. मृत्यूपश्चात पितरांचा सन्मान म्हणून श्राद्धविधी करण्याबरोबरच व्यक्ति हयातीत असतांनाही त्यांचा सन्मान करा. 

लोभ - लोभ आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो. लोभापायी लोक बर्‍याच चुकीच्या गोष्टी करतात. मोहाचा एक क्षण पश्चात्तापाच्या अनेक क्षणांना आमंत्रण देतो. लोभापायी फसलेल्या लोकांना बरेच नुकसान सहन करावे लागते. याशिवाय चुकीचे काम केल्याने त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंद नसतो. अशा लोकांना पितरांचा आशीर्वाद कधीच प्राप्त होत नाही, परिणामी त्यांनी केलेल्या पिंडदानाला कावळादेखील शिवत नाही. 

संपत्तीची बढाई मारणे- श्रीमंत होणे ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याबद्दल बढाई मारणे खूप वाईट आहे. श्रीमंत असण्याचा खरा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा ती व्यक्ती त्या पैशाचा उपयोग दान करण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी करते. अशी संचित संपत्ती जी कोणत्याही गरजूंसाठी उपयुक्त ठरत नाही, त्या संपत्तीचा ऱ्हास होत जातो आणि लवकरच ती संपुष्टात येते.  पितृपक्षात दान धर्म करावा पण त्याचा गाजावाजा न करता ते कर्तव्य समजून पार पाडावे. 

घाणेरडे कपडे घालणे- जे लोक घाणेरडे कपडे घालतात, अस्वच्छ राहतात, घर, परिसर अस्वच्छ ठेवतात, त्यांच्यावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि लोकही त्यांना जवळ करत नाहीत. अशा लोकांच्या आयुष्यात केवळ नकारात्मकता भरलेली असते. त्यांना लोकसंग्रह करता येत नाही. कावळ्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म असते. तो बारीक गोष्टी सूक्ष्मपणे टिपतो.  म्हणून पिंडदानासाठी इतर पक्ष्यांच्या तुलनेत कावळ्याचीच निवड केली आहे. त्यामुळे अस्वच्छ राहणार्‍या, वागणार्‍या आणि अस्वच्छ ठिकाणी श्राद्धविधी करणार्‍याच्या पिंडाला कावळा शिवत नाही. त्यामुळे श्राद्धविधी करताना शास्त्र आणि स्वच्छता दोन्ही पाळा. 

रात्रीचे दही सेवन- दही आरोग्यासाठी चांगले असते, परंतु रात्री त्याचे सेवन केल्यास अनेक आजार होतात. त्यामुळे पैशांचा अपव्यय होतो. पैसे खर्च होतात आणि रोगग्रस्त शरीर स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखाचे कारण बनते. म्हणून शारीरिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रात्री दहयाचे सेवन टाळा. याउलट श्राद्धविधी करताना पिंडावर दही घातले नाही तर कावळा पिंडाला शिवत नाही, हेही लक्षात ठेवा!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष