शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 11:39 IST

Pitru Paksha 2024: आज पितृ अष्टमी, आजच्या दिवशी गजलक्ष्मी व्रत करतात; हे प्रभावशाली व्रत कसे करायचे व कोणते स्तोत्र म्हणायचे ते जाणून घ्या.

पितृपक्षाच्या अष्टमीला महालक्ष्मी व्रत साजरे केले जाते. हे व्रत दिवाळीतल्या लक्ष्मीपूजेइतके महत्त्वाचे मानले जाते. पितरांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, वैभवलक्ष्मी नांदावी यासाठी पितृपक्षाला जोडून देवीच्या आवडत्या अष्टमी तिथीला हे व्रत केले जाते. या व्रताला गजलक्ष्मी व्रत असेही म्हणतात. उत्तर भारतात हे व्रत मोठ्या प्रमाणात केले जाते. आज २४ सप्टेंबर रोजी ही पूजा करायची आहे. ही पूजा तिन्ही सांजेला केली जाते. या व्रताबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

या दिवशी  देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवीचे वाहन म्हणून हत्तीचीदेखील पूजा केली जाते. गजलक्ष्मी व्रताच्या दिवशी हत्तीवर आरूढ झालेल्या देवीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. यासाठी माती, चांदी, कास्य, तांबे यापासून बनलेल्या मूर्तींचाही पूजेत वापर करता येतो. परंतु मूर्ती उपलब्ध नसेल तर प्रतिमेचे पूजन करता येते. 

दिवाळीतील लक्ष्मीपूजेसारखी ही पूजा देखील सायंकाळी सूर्यास्तानंतर केली जाते. देवीची षोडशोपचारे पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यावेळी देवीकडे आपल्यासाठी नाही, तर पितरांना सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. पितर संतुष्ट असले तर देवीच्या कृपेने आपल्या घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो. 

आता पाहूया पूजा विधी : 

  • महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी, लक्ष्मीच्या पूजेची जागा संध्याकाळी स्वच्छ करून घ्या. 
  • तिथे पाट किंवा चौरंग मांडून घ्या. 
  • त्याभोवती सुंदर रांगोळी काढा. 
  • पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्या. 
  • त्यावर तांदुळाची रास रचून पाण्याचा कलश ठेवा. 
  • ताम्हनात लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. 
  • देवीला हळद कुंकू वाहून, सुंगंधी फुले अर्पण करा. 
  • फळांचा, मिठाईचा नैवेद्य दाखवा. 
  • पितरांचे स्मरण करा, त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. 
  • देवीची आरती म्हणा. 
  • दुसऱ्या दिवशी पूजेतील प्रतिमा उचलून तांदूळ, मिठाई, फळे यांचे सत्पात्री दान करा. 
  • अशाप्रकारे सोप्या पद्धतीने गजक्ष्मी व्रत करता येते व पुण्य पदरात पाडून घेता येते. 

गज लक्ष्मी स्तोत्र : 

जय जय दुर्गति नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।रधगज तुरगपदाति समावृत परिजन मंडित लोकनुते ।हरिहर ब्रम्ह सुपूजित सेवित ताप निवारिणि पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि गजलक्ष्मि रूपेण पालय माम् ।

 

 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३