शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2022 : पूर्वजांसाठी मोक्षाचे द्वार खुले व्हावे, यासाठी पितृपक्षात करा इंदिरा एकादशीचे व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:44 IST

Pitru Paksha 2022 : एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी. दर महिन्यात ती दोनदा येते. दर एकादशीचे महत्त्वही आगळे वेगळे आहे. त्याचप्रमाणे २१ सप्टेंबर रोजी येणाऱ्या इंदिरा एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. 

पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो. या कालावधीत पितर आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या न कोणत्या स्वरुपात पृथ्वीवर अवतीर्ण होतात, अशी पूर्वापार श्रद्धा आहे. त्यांच्याप्रती ऋणनिर्देशन म्हणून श्राद्धविधी केला जातो. त्यामुळे पितर तृप्त होऊन वंशजांना भरभरून आशीर्वाद देतात. अशा या पुण्यसमयी एकादशीच्या व्रताची भर पडली तर दुग्दशर्करा योगच म्हटले पाहिजे. 

इंदिरा एकादशीच्या दिवशी, पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासना आणि पूजा केली जाते.  ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असतो, त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे. त्यामुळे पितृदोष दूर होऊन पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पुढील पिढीला कसलीही बाधा येत नाही. या दिवशी आपला उपास असला, परंतु पितरांची तिथ असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये, तर श्राद्धाचा नैवेद्य करावा, काकबली वाढावा, गायीला, कुत्र्याला पान वाढावे आणि आपण एकादशीचा उपास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णाला किंवा भगवान विष्णूंना फुल वाहून नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा. 

इंदिरा एकादशीची पौराणिक कथा : 

इंदिरा एकादशीच्या दिवशी पवित्र राजा इंद्रसेनने पितृ लोकात आपल्या वडिलांच्या उद्धारासाठी उपवास व पूजा केली होती. यामुळे त्यांना वैकुंठ लोक प्राप्त झाले. तेव्हापासून इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपास आणि पूजा करण्याचा नियम आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे, त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे. पंचांगानुसार, या वर्षी इंदिरा एकादशीचा उपवास २१ सप्टेंबर रोजी बुधवारी केला जाईल. इंदिरा एकादशीच्या उपास आणि उपासनेची पद्धत जाणून घेऊया ...

उपवास पद्धत :

इंदिरा एकादशीचे व्रत पितृ पक्षात येत आहे आणि त्याचा उपवास विशेषतः एखाद्याच्या मृत पूर्वजांच्या, पूर्वजांच्या उद्धारासाठी साजरा केला जातो. म्हणून इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासात विशेष स्थान आहे. त्याचे पारण द्वादशीच्या दिवशी केले जाते. इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. वरचेवर फराळ न करता ठराविक वेळी फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्न दान करून उपास सोडावा. 

 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष