शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi January 2022: सन २०२२ मधील पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ योग आणि चंद्रोदय वेळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 20:59 IST

Sankashti Chaturthi January 2022: पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, व्रताचरण पूजनाची सोपी पद्धत आणि विविध शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घ्या...

सन २०२२ हे इंग्रजी नववर्ष सुरू झाले आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. हजारो भाविक या दिवशी गणपती बाप्पाचे नामस्मरण, पूजन करतात. गणपती स्तोत्र, मंत्राचे पठण करतात. आपल्या आवडत्या बाप्पाची कृपादृष्टी राहावी म्हणून आपण दर महिन्याला संकष्टीचा उपास करतो. संकष्टीचे व्रत शीघ्र फलदायी आहे, असे म्हणतात. सन २०२२ मधील पहिली पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येत आहे. यामुळे या दिवसाचे महत्त्व वेगळे असल्याचे सांगितले जाते. पौष संकष्ट चतुर्थीची व्रताचरणाची सोपी पद्धत, मुहूर्त आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... (Paush Sankashti Chaturthi January 2022)

सन २०२२ मधील पहिली संकष्ट चतुर्थी: शुक्रवार, २१ जानेवारी २०२२

पौष संकष्ट चतुर्थी प्रारंभ: शुक्रवार, २१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०८ वाजून ५१ मिनिटे.

पौष संकष्ट चतुर्थी समाप्ती: शनिवार, २२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०९ वाजून १४ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण शुक्रवार, २१ जानेवारी २०२२ रोजी करावे, असे सांगितले जाते. पौष संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजन करायचा शुभ मुहूर्त हा सकाळी ०९ वाजून ४३ मिनिटे ते १० वाजून ३० मिनिटे आहे. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत राहुकाळ आहे. या दिवशी नक्षत्र पूर्वाफाल्गुनी आहे. तर चंद्र सिंह राशीत विराजमान असेल. संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येत असल्यामुळे गणपती बाप्पासोबत देवीचे पूजन करणे लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

पाहा, संकष्ट चतुर्थी व्रताचरणाची सोपी पद्धत

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकून घ्यावीत. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीला अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करावा आणि त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री आपापल्या ठिकाणची स्थानिक चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. या दिवशी गणपती बाप्पाची स्तोत्रे म्हणावीत. स्तोत्र पाठ नसतील तर 'नमो भगवते गजाननाय' या मंत्राचा जप करावा. संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी, असे सांगितले जाते. 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून २१ मिनिट
सातारारात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
अहमदनगररात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून १२ मिनिट
वर्धारात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
औरंगाबादरात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता ११ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून ०८ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून १० मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे 
इंदौररात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी