शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
4
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
5
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
6
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
7
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
8
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
9
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
10
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
11
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
12
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
13
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
14
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
15
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
16
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
17
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
18
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
19
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
20
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

पौष संकष्ट चतुर्थी: कसे करावे व्रत? गणपती बाप्पा होईल प्रसन्न; चंद्रोदय वेळ जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 07:07 IST

Paush Sankashti Chaturthi January 2024: नववर्ष २०२४ मधील पहिली संकष्ट चतुर्थी असून, व्रताचरण तसेच चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या...

Paush Sankashti Chaturthi January 2024: वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ नववर्ष २०२४ सुरू झाले आहे. मराठी महिन्यातील पौष महिना सुरू आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. २९ जानेवारी २०२४ रोजी नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी अनेकविध शुभ योग जुळून येत असून, संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे? काही मान्यता, व्रतपूजाविधी आणि चंद्रोदय वेळा जाणून घ्या...

गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे.  

पौष संकष्ट चतुर्थी: २९ जानेवारी २०२४

पौष संकष्ट चतुर्थी प्रारंभ: रविवार, २८ जानेवारी २०२४ रोजी पहाटे ०६ वाजून १० मिनिटे.

पौष संकष्ट चतुर्थी सांगता: मंगळवार, ३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ०८ वाजून ५३ मिनिटे.

सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र, संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, हे प्रदोष काळी करायचे व्रत आहे. विशेष म्हणजे पौष वद्य चतुर्थी तिथी अहोरात्र आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हनात अर्घ्य द्यावे. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपास सोडावा. उपास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात.

संकष्ट चतुर्थी व्रताचरणाची पद्धत 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे
वर्धारात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून ०८ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपतीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सव