शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Papmochani Ekadashi 2022 : कार्यसिद्धीसाठी 'या' सोळा महत्त्वपूर्ण कामांच्या वेळी घ्या विष्णूंचे षोडश हरिनाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:53 IST

Papmochani Ekadashi 2022: आज पापमोचनी एकादशी आहे. त्यामुळे आज भगवान विष्णूंच्या आवडत्या तिथीपासून भगवन्नाम घेण्यास सुरुवात करू. विष्णू षोडशनाम स्तोत्र व त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे -

आपली संस्कृती सांगते, की प्रत्येक काम ईश्वराला स्मरून करा. भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू तुझे प्रत्येक कर्म 'श्रीकृष्णार्पणमस्तु' असे म्हणून मला अर्पण कर, मग त्या कर्माचे काय फळद्यायचे ते मी पाहतो. म्हणजेच आपली कृती अहंकार विरहित असायला हवी असे भगवंताला अपेक्षित आहे. म्हणून कर्ता करविता तोच आहे हे ध्यानात ठेवून त्याचे स्मरण करावे. यासाठीच शास्त्रात भगवान विष्णूंची सोळा नावे दिली आहेत, ती नावे १६ महत्त्वाच्या कामांच्या वेळी स्मरावीत असे शास्त्र सांगते. ती नावे आणि कामे कोणती ते जाणून घेऊ. 

आज पापमोचनी एकादशी आहे. त्यामुळे आज भगवान विष्णूंच्या आवडत्या तिथीपासून भगवन्नाम घेण्यास सुरुवात करू. विष्णू षोडशनाम पुढीलप्रमाणे -

औषध घेताना  : विष्णवे नमः। (जगाचं रक्षण करणारे आमचं रक्षण करो)भोजन करताना : जनार्दाय नमः । (जगाचं पोषण करणारे आमचे पोषण करो)झोपण्यापूर्वी   : पद्मनाभाय नमः । (शेषावर झोपणारे आम्हाला निद्रासुख देवो)विवाहासमयी : प्रजापतये नमः । (सर्वांचे पालन करणारे आमच्या संसाराचे पालन करो)युद्धामध्ये  : चक्रधाराय नमः । (अर्जुनाच्या पाठीशी उभे राहणारे आमच्या पाठीशी राहो)प्रवासात असताना  : त्रिविक्रमाय नमः । (वामनाचा अवतार असणारे आमचा प्रवास सुखरूप करो)मरणासन्न असताना : नारायणाय नमः । (ज्याच्याशी एकरूप व्हायचे आहे त्याचे स्मरण होवो)प्रिय व्यक्तीची भेट होताना : श्रीधराय नमः । (सर्वांना रमवणारा परमात्मा प्रिय व्यक्तीच्या रूपाने भेटो)वाईट स्वप्नं पडल्यास : गोविंदाय नमः । (जागृत-निद्रा अवस्थेत त्याचे सदैव स्मरण असो)संकटात असताना  : मधुसूदनाय नमः । (गोकुळवासीयांचा उद्धार करणारा आमचाही उद्धार करो)अरण्यात असताना  : नरसिंहाय नमः । (नरसिंहरूपी भगवंत पाठीशी असताना श्वापदांपासून रक्षण होवो)आग लागलेली असताना  : जलशायीने नमः । (पंचतत्वात सामावलेल्या ईश्वराने रक्षण करो)पाण्यात असताना   : वराहरुपाय नम: । (वराह रूपाने बुडत्या पृथ्वीला आधार देणाऱ्याने आमचाही सांभाळ करो)पर्वतावर असताना  : रघुनंदनाय नमः । (वनवासी असूनही दंडकारण्यातील जीवांना अभय देणाऱ्याने आमचे रक्षण करो)बाहेर जात असताना  : वामनाय नमः । (वामन रूपाने अतिथी म्हणून जाणाऱ्याने आमच्या प्रवासाला दिशा देवो)सर्व प्रकारची कामे करताना : माधवाय नमः । (प्रत्येक कर्माचा साक्षीदार भगवंत असो)

श्रीगणेशाय नमः।औषधे चिन्तयेद विष्णुं भोजने च जनार्दनंशयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिमयुद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमंनारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमेदु:स्वप्ने स्मर गोविन्दं संकटे मधुसूदनमकानने नारसिंहं च पावके जलशायिनमजलमध्ये वराहं च पर्वते रघुनंदनमगमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवंषोडश-एतानि नामानि प्रातरुत्थाय य: पठेतसर्वपाप विनिर्मुक्तो विष्णुलोके महीयतेइति विष्णो षोडशनाम स्तोत्रं सम्पूर्णं

तुम्ही म्हणाल, या सोळा कामांच्या वेळी सोळा नामे कशी लक्षात ठेवावीत त्यावर उत्तर सोपे आहे. १६ श्लोकी स्तोत्र पाठ करून त्याचे नित्य पठण करणे हे जास्त सोपे आहे. या स्तोत्राचा अवलंब करा आणि आपली जबाबदारी पार पाडून उर्वरित कार्य ईश्वरावर सोपवून निश्चिन्त व्हा!