शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विपश्यना अभ्यासाचे मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 04:16 IST

क्षण-प्रतिक्षण बदलत राहणे, त्या सतत परिवर्तित होणाऱ्या क्रियांना स्वानुभवाने समजू शकलो, तरच या शब्दाचा अर्थ योग्यप्रकारे समजू शकू, जसा भगवान बुद्धांना अपेक्षित आहे.

- फरेदुन भुजवालाभगवान गौतम बुद्ध यांनी शिकवलेल्या विपश्यना अभ्यासाचे विश्लेषण अनेक प्रवचनांमधून झाले आहे़ विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू विपश्यनाचार्य सयाजी उ बा शिन यांनीही त्यांच्या प्रवचनातून या विद्येच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले आहे़ भगवान बुद्ध यांच्या शिकवणुकीत तीन आवश्यक लक्षणे सांगितली गेली आहेत़ अनित्य, दु:ख व अनात्म़ जर तुम्ही अनित्यतेला योग्यप्रकारे जाणले तर दु:खाला सखोलतेने समजू शकता आणि अनात्मलाही़ अनात्म म्हणजे, जे ‘मी-माझे’ नाही़ त्याला समजण्यास वेळ लागतो़ अनित्यता, एक असे सत्य आहे, ज्याचा अभ्यासाद्वारे अनुभव केला जाऊ शकतो व नियमित अभ्यासाद्वारे योग्यप्रकारे समजले जाऊ शकते़ त्याच्यासाठी शास्त्रीय ज्ञान पर्याप्त नाही़ कारण त्याने आनुभूतिक ज्ञानाची प्राप्ती होणार नाही़ अनित्यतेचा अर्थ व स्वभाव आहे. क्षण-प्रतिक्षण बदलत राहणे, त्या सतत परिवर्तित होणाऱ्या क्रियांना स्वानुभवाने समजू शकलो, तरच या शब्दाचा अर्थ योग्यप्रकारे समजू शकू, जसा भगवान बुद्धांना अपेक्षित आहे़ जसे बुद्धांच्या काळात, तसेच आजही, कोणीही अनित्यतेला अनभुव करून समजू शकतो़ जरी त्याने बुद्ध साहित्याचे एकही पुस्तक वाचले नसले तरी़ अनित्यतेला समजण्यासाठी प्रत्येकाला शिस्तीने व परिश्रमपूर्वक अष्टांगिक मार्गावर चालावे लागेल़ शील, समाधी व प्रज्ञेला जीवनात उतरावे लागेल़ शील, समाधीचा आचार आहे़ शील पालनाद्वारेच मनाला एकाग्र केले जाऊ शकते़ जेव्हा मन सम्यक रूपाने एकाग्र होते, तेव्हाच प्रज्ञा विकसित होते़ त्यामुळे शील हे समाधीला पुष्ट करण्यासाठी व समाधी ही प्रज्ञेला पुष्ट करण्यासाठी आवश्यक आहे़ प्रज्ञेचा अर्थ आहे, अनित्य, दु:ख व अनात्म यांना विपश्यनेच्या अभ्यासाने समजणे़ बुद्ध शिकवणीचे लक्ष हे दु:खातून नितांत मुक्ती प्राप्त करणे, असे विपश्यनाचार्य सयाजी उ बा खिन हे प्रवचातून सांगत असत़