शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या जीवाला गुरुरुपी काडीचा आधार हवाच!- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 08:00 IST

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शक लागतोच. आपण कितीही स्वयंभू म्हणवून घेतले, तरी दुसऱ्याच्या मदतीशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. ती मदत किरकोळ का असेना. बुडत्याला काडीचा आधारही पुरतो. 

सद्गुरुंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरु सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरु सांगतात. सद्गुरु आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरु जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही, असे ज्याने म्हटले, त्याने खरोखरच सद्गुरु केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तु गृहस्थ मी स्वस्थ आहे, असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते, तोपर्यंत तो स्वस्थ आहे, असे नाही म्हणता येणार.

शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो, त्याचा कार्यभार सद्गुरु उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली, तो खरा गुरु. जे चिरकाल टिकते, ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेले अक्षरश; पाळने हेच खरे साधन. संत कुणालाही कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो, तो महत्त्वाचा आहे.

पुष्काळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत, ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला, तर पुढे वाढतो. त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपले कर्तव्य कोणते, ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात.

रथ आहे खरा, पण त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे, म्हणून ती मालकाला चालवता येणार नाह. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्यामध्ये पडतो. सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरुपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल, तेवढेच आपल्याला मिळणार आहे. अशी आपली वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली, की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले, की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंत:कराची शुद्धता हा पाया आहे.