शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

नृसिंह नवरात्र प्रारंभ : लक्ष्मी नृसिंह देवाची आराधना करणा-यांना शनिदेव त्रास देत नाही असे वरदानआहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:27 IST

नरसिंह देवाचा अवतार हा संध्याकाळी झाला असल्याने लक्ष्मीनृसिंह स्तोत्र तिन्हीसांजेस म्हटल्यास त्याचे विशेष फल मिळते.

सोळा हात (षोडषबाहू) असलेली श्री नरसिंहस्वामींची मूर्ती. ही फक्त मंत्रालय इथेच मात्र आहे. ही मूर्ती बघण्याची संधी व भाग्य फक्त वर्षातून एकदाच मिळते. 

लक्ष्मी नृसिंह देवाची आराधना करणाऱ्यांना शनिदेव त्रास देत नाही असे वरदानआहे. नरसिंह देवाचा अवतार हा संध्याकाळी झाला असल्याने लक्ष्मीनृसिंह स्तोत्र तिन्हीसांजेस म्हटल्यास त्याचे विशेष फल मिळते. इथे करावलंब स्तोत्र देत आहे, ते खूप प्रभावी स्तोत्र आहे. रोज शनिवारी सायंकाळी म्हणून बघा, तुमचे कष्ट दूर होतील. या स्तोत्रामागे पूर्वपीठिका आहे. श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र, श्री शंकराच्या अनेक स्तोत्रांपैकी एक आहे. 

एकदा श्रीशंकर श्रीशैलम इथे राहत होते, कापालिक नावाचा एक संन्यासी शंकराकडे येऊन स्वत: करत असलेल्या पूजेसाठी एका संन्यासाचा बली द्यायचा आहे, असे शंकराला सांगतो. कारुण्यमूर्ती श्री शंकर त्याला लगेच संमती देतात. गूरुंचा परम शिष्य पद्मराज, नरसिंह देवाची प्रार्थना करुन, नरसिंह देवाला आपल्या शरीरात प्रवेश करण्याचे आवाहन करतो व क्रोधपूर्ण आवेशात त्या कापालिकाचा बली देतो. श्री पद्मराजाच्या अंगी झालेला नरसिंहाचा अविर्भाव शांत करण्यासाठी श्री शंकर त्याक्षणी  १७ चरणांचे हे स्तोत्र रचतात ते स्तोत्र म्हणजे श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र. नावाप्रमाणेच, त्या परमात्म्याचा कर अवलंबून ( हात धरुन) आपण हा भवसागर तरुन जाण्यासाठी आमचे रक्षण कर असे साकडे घालणारे हे स्तोत्र आहे. या श्लोकाच्या पठणाने भूलोकी असलेले सकल कष्ट, दु:ख, अनारोग्य, सर्व पापेही नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होण्याची करुणा होते. हे स्तोत्र प्रात:काळी तसेच संध्याकाळी पठण केल्यास उत्तम. पुढील स्तोत्राची रचना आदी शंकराचार्य यांनी केली आहे. 

श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र। श्री मत्पयोनिधिनेकेतन चक्रपाणी । भोगिंद्रभोगमणेराजित पूण्यमूर्ती ।

योगिश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १ ।।ब्रम्हेंद्ररुद्रमरुदर्ककिरिटकोटि संघ-  टितांघ्रिकमलामलकांतिकांत। लक्ष्मीलसत्कूचसरोरुहराजहंस लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। २ ।।संसारदावदहनाकरभिकरोरुज्वा- लावळीभिरतीदग्धतनुरुहस्य ।त्वत्पादपद्मसरसिरुहमागतस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ३ ।।संसारजालपतिततस्य जगन्निवास सर्वेंद्रियार्थ बडिशाग्र झशोपमस्य ।प्रोत्कंपित प्रचुरतालुकमस्तकस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ४ ।।संसारकुपतिघोरमगाधमुलं संप्रास्य दु:खशतसर्पसमाकुलस्य ।दीनस्य देव कृपणापदमागतस्य । लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ५ ।।संसारभिकरकरींद्रहराभिघात निष्पिड्यमानवपूष: सकलार्तिनाश । प्राणप्रयाणभवभीतीसमाकुलस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ६ ।।संसारसर्पविषदिग्धमहोग्रतीव्र दंष्ट्राग्रकोटिपरिदष्टविनष्टमूर्ते: । नागारिवाहन सुधाब्धिनिवास शौरे लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ७ ।।संसारवृक्षबिजमनंतकर्मा- शाखा यातं करणपत्रमनंगपुष्पम ।आरुह्य दु:खफलित: चकित: दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ८ ।।संसारसागरविशालकराळकाळ नक्रग्रहग्रसितनिग्रहविग्रहस्य । व्यग्रस्य रागनिचयोर्मिनिपिडितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ९ ।।संसारसागरनिमज्जनमुह्यमानं दीनं विलोकय विभो करुणानिधे माम ।प्रल्हादखेदपरिहारपरावतार लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १० ।।संसारघोरगहने चरतो मुरारे मारोग्रभीकरमृगप्रचुरार्दितस्य । आर्तस्य मत्सरनिदाघ्रसुदु:खितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ११ ।।बध्पदागले यमभटा बहु तर्जनीयंत कर्षंती यत्र भवपाशशक्तैर्यातं माम  । ऐकाकीनं परवशं चकितं दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १२ ।।लक्ष्मीपते कमलनाभ सुरेश विष्णो  यज्ञेश यज्ञ मधुसुदन विश्वरुप । ब्रम्हण्य केशव जनार्दन वासुदेव लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १३ ।।एकेन चक्रमपरेण करेण शंख- मन्येन सिंधुतनयामवलंब्य तिष्ठन । वामेतरेण वरदाभयपद्म चिन्हं लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १४ ।।अंधस्य मे हृतविवेकमहाधनस्य चोरैर्माहाबलिभिरिंद्रियनामधेय्यो: । मोहांधकारकुहरे विनिपातितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १५ ।।प्रल्हादनारदपराशरपुंडरिकव्यासा-दिभागवतपुंगवहृन्मिवास ।भक्तानुरक्तपरिपालनपारिजात लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १६ ।।लक्ष्मीनृसिंह चरणाब्जमधुव्रतेन स्तोत्रं कृतं शुभकरं भूवि शंकरेण ।  यो तत्पठंति मनुजा हरिभक्तियुक्ता-स्तेयांति तत्पदसरोजमखंडरुपम ।। १७ ।।

समाज माध्यमांवरून माहिती साभार!