शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आता माणसांना गरज आहे, जनावरांकडून भूतदया शिकण्याची; वाचा एका बिबट्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 07:00 IST

भूतदया हा शब्द मानवाने निर्माण केला, पण शब्दाचे मर्म स्वतःच विसरला. प्राण्यांकडून नेमकं हेच शिकण्याची वेळ आली आहे!

जंगली श्वापदांची भीती वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून आपण प्राणी संग्रहालयात जाऊन त्यांना पाहतो. कारण ते बंद पिंजऱ्या आड असतात. अभयारण्यातही जिप्सीमध्ये बसून, स्वसंरक्षणासाठी हातात बंदुका घेऊन श्वापदांच्या दर्शनाला निघतात. मात्र प्राण्यांची नियमावली ठरलेली असते. ते उपाशी पोटी शिकार करतात. किंवा स्व संरक्षणासाठी डरकाळी फोडतात. मात्र उठ सूट कोणत्याही श्वापदाची शिकार करत नाहीत. न बोलता, न शिकवता ते नियम पाळतात, अंमलबजावणी करतात आणि स्वतः बरोबर दुसऱ्याच्या स्वातंत्र्यालाही महत्त्व देतात. हे सांगणारे एक उदाहरण बिबट्याच्या बाबतीत पाहता येईल. पाहूया ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली गोष्ट...!

कर्नाटकातील कोंबरु अभयारण्याशेजारचे जे रेस्टहाऊस आहे तिथली घटना आहे. एक बिबट्या त्याचं सहजभक्ष्य असलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत छलांग लगावत होता. कुत्रा टॉयलेट ला असलेल्या एका झरोक्यातून आत घुसला, बाहेरून टॉयलेटचा दरवाजा बंद होता. कुत्रा आत घुसला तसा बिबट्याही त्याच्या मागे घुसला आणि त्या टॉयलेटमध्ये अडकून पडला. कुत्रा बिबट्याला घाबरून एका कोपर्‍यात जाऊन बसला. भुंकण्याचीही त्याची हिम्मत झाली नाही. बिबट्या भुकेला असूनही त्याने त्या कुत्र्याला फाडले नाही, एका झेपेतच तो त्या कुत्र्याची चटणी करून आपले डिनर करू शकला असता पण ते दोन प्राणी एकेका कोपऱ्यात तब्बल बारा तास होते तरीही बिबट्याने कुत्र्याला कोणतीही इजा केली नाही.

वनविभागाने गुंगीच्या गनने बिबट्याला जेरबंद केला. आता प्रश्न असा आहे की भुकेल्या बिबट्याने सहजशक्य असताना त्या कुत्र्याला का फाडले नाही???तर वन्यजीव अभ्यासकांनी असं उत्तर दिलं की वन्यजीव आपल्या स्वातंत्र्याविषयी अत्यंत संवेदनशील असतात. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतल्याची जाणीव होताच ते अत्यंत खोल दुःखात जाऊ शकतात, ते इतकं की त्यांची भूकेलाही विसरू शकतात. तिथे पोट भागवण्याची नैसर्गिक प्रेरणा मावळू लागते, इतकं मोठं पारतंत्र्यातचं दुःख आहे.