शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

केवळ शहरं नाही तर गावं प्रगत झाली पाहिजे, तरच भारताचा विकास होईल! - तुकडोजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 07:00 IST

आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे, भारताच्या विकासाचा विचार त्यांनी किती दूरदृष्टीने केला होता ते पहा!

राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हायला हवे. खेडे हे एक स्वयंपूर्ण घटक म्हणून भारतात असायला हवे, तरच भारत प्रगत राष्ट्रांमध्ये मान्यता पावेल, असा उदात्त विचार देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ३० एप्रिल रोजी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून घेऊ. 

तुकडोजी महाराज विशेषकरून ओळखले जातात, ते त्यांच्या समाजसेवेमुळे आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेमुळे. `सर्व जीव देवासमान समजून पूजा करा' हे गीतेचे सार तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून सोपे करून मांडले आहे.

बालपणीच अडकोजी महाराजांचे शिष्यत्त्व पत्करून त्यांनी परमार्थ मार्गातील साधना करण्यात काही वर्षे घालवली. ही साधना चालू असताना त्यांनी जगास उपदेश करण्याचे कार्य सुरू केले. महात्माजींच्या प्रेरणेने त्यांनी ईशस्तवनाबरोबर गावातील सामाजिक सुधारणा, सर्वांगीण सुधारणा, शिक्षण, ग्रामविकास इ. गोष्टींवर भर दिला. 

गावोगावी फिरून समाज प्रबोधन केले. `श्रीगुरुदेव' नावाचे मासिक काढून अनेक वर्षे चालवले. वऱ्हाडात 'मोझेरी' या गावी एक आश्रम बांधला. गावोगावी त्याच्या शाखा उपशाखा काम करत असत. त्यामुळे नागपूर-वऱ्हाडात त्या सेवामंडळाचा मोठा अनुयायी वर्ग निर्माण झाला.

ग्रामसफाई, सुतकताई, दवाखाने, शाळा, प्रार्थना वगैरे अनेक गोष्टींद्वारा त्यांनी ठिकठिकाणी खेड्यांना शिस्तीचे आणि समाजसेवेचे वळण लावले. त्या कार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले. प्रकृती ठीक नसतानाही जपानमध्ये जाऊन तेथे भरलेल्या धर्मपरिषदेत आपल्या मानवताधर्माचे स्वरूप विशद करून सांगितले.

तुकडोजी महाराजांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. गावोगावी सामुदायिक प्रार्थना होऊ लागल्या. शेकडो सेवक निर्माण झाले. आधुनिक विज्ञानाचे भांडवल नसतानाही निष्ठा व श्रद्धा या शिदोरीवर जगून समाजाच्या मूलभूत प्रेरणेला जागृत करण्याचे काम होऊ लागले. खेड्यातील अज्ञ जनता शिक्षाबद्ध होऊ लागली. खेड्यात खराटे खरखरू लागले, रस्ते नाल्या बांधल्या जाऊ लागल्या. हे कार्य ज्या शब्दांनी, ज्या भावनांनी, ज्या विचारांनी साधले त्या सगळ्याचा सुव्यवस्थित संग्रह म्हणजे 'ग्रामगीता'!

तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत ४१ अध्यायांमध्ये जे विषय हाताळले आहेत, त्यांच्या नुसत्या शीर्षकावरून आपल्याला ग्रामगीतेचे मर्म लक्षात येईल. देवदर्शन, धर्माध्ययन, आश्रमधर्म, संसार-परमार्थ, वर्ण व्यवस्था, संसर्ग प्रभाव, आचार प्राबल्य, प्रचार महिमा, सेवा सामथ्र्य, संघटनशक्ति, ग्रामरक्षण, ग्रामशुद्धी, ग्राम निर्माण कला, ग्राम आरोग्य, गोवंश सुधार, वेष वैभव, गरीबी श्रीमंती, श्रम संपत्ती, जीवनशिक्षण, महिलोन्नती, वैवाहिक जीवन, अंत्यसंस्कार, सणोत्सव, यात्रा मेळे, देव देवळे, मूर्तीउपासना, सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना व विश्वधर्म, दलित सेवा, भजन प्रभाव, संत चमत्कार, संत स्वरूप, अवतारकार्य, प्रारब्धवाद, प्रयत्नवाद, जीवन कला, आत्मानुभव, ग्रामकुटुंब, भूवैकुंठ, ग्रंथाध्ययन, ग्रंथ महिमा!

साध्या सोप्या शब्दात रचलेली ग्रामगीता आपण याआधी कधी वाचली नसेल, तर तुकडोजी महाराजांच्या जयंतीहून दुसरे चांगले औचित्य ते काय?