शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

वारी नाही....पण श्रद्धाभाव कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:46 IST

वारकरी सांप्रदायातील वारकरी घरीच बसून आषाढी वारीचा आनंद सोहळा घेण्यात मानतो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वात मोठा वारकरी सोहळा आहे. लाखो वारकरी कोणत्याही नियोजनाशिवाय स्वयंप्रेरणेने पंढरपूरला येतात. प्रत्येक वारीत पांडुरंगाकडे एकच मागणे मागत असतो की, ‘पंढरीचा वारकरी... वारी चुकू न द्यावी हरी...!’ मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी आणि पायी पालखी सोहळा होणार नसल्याने वारकरी सांप्रदायातील वारकरी घरीच बसून आषाढी वारीचा आनंद सोहळा घेण्यात मानतो आहे.ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता समतेची पताका खांद्यावर, कोणी उच्च नाही, स्त्री-पुरुष समानता, एकमेकांच्या पाया पडणारे, आपली शेकडो वर्षांची परंपरा जोपासणारे वारकरी. एकीकडे पावसाची चाहूल लागत असताना दुसरीकडे विठुरायाच्यादर्शनाची आस भाविकांना लागत असते. शेकडो मैल चालत येऊन सावळ््या विठुरायाचे दर्शक घेण्याची शेकडो वर्षांपासून सुरु असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनचा हा पहिला आषाढी साहळा असेल की, सर्वसामान्य भाविक पंढरपुरला जाऊन सावळ््या विठुरायाचे पदस्पर्श व मुखदर्शन घेऊ शकत नाहीत. असे असले तरी मनातला भाव आणि विठ्ठलाप्रती असलेली ओढ कमी होणार नसल्याचे वारकरी सांप्रदायातून सांगितले जात आहे. कोरोना महामारीचे संकट पांडुरंग लवकरच दूर करेल, असाही विश्वास वारकऱ्यांनी बोलून दाखविला.दरवर्षी पंढरपूर येथे जात असतो. लग्न झाल्यानंतर जी पंढरपूर वारी सुरू केली ती आता यावर्षी कोरोनामुळे खंड पडली तरी आमचा विठ्ठल आम्हाला शेतमाउली व गावकुसातील मंदिरात दर्शन देईल, अशी श्रद्धा आहे. गावातील मंदिरात पूजाअर्चा करणार असल्याचे सांगितले.- शंकरराव शेळकेचांगलवाडी

सतत ४० वर्ष वारीची परंपरा जोपासली. कधी खंड पडू दिला नाही; मात्र यावर्षी कोरोनामुळे वारीमध्ये खंड पडला. वारी नाही म्हटल्यावर जिवाला हुरहुर वाटत आहे; परंतु कोरोनाचे संकट असल्याने घरीच राहून विठ्ठलाच्या नामस्मरणात यावर्षी आषाढी साजरी- हभप सुभाष महाराज इंगळेपातूरमी गेल्या १५ वर्षांपासून पायदळ पंढरपूरला अखंडित जात आहे; मात्र यावर्षी आपल्या देशावर आलेल्या कोरोना महामारीमुळे यावर्षी मी जाऊ शकत नाही. त्यामुळे अंत:करण भरून येत आहे. यावेळी घरीच पूजा करून महामारी लवकरच जावो, अशी प्रार्थना करणार आहे.- लीलाबाई महादेव सापधारे, मुंडगावगावातील ३० ते ३५ महिला, पुरुष आमच्या सोबत पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असतात. या वर्षी कोरोना प्रतिबंधामुळे ते शक्य नाही. विठ्ठल चरचरात वसला आहे. तो आमची दर्शन वारी मनोभावे पूर्ण करेल. तनाने वारीत खंड पडला तरी मनाने वारी पूर्ण होईल.- हभप विनायक महाराज ठाकरेकरणदरवर्षी माझी वारी पूर्ण होते.पिढ्यान्पिढ्या आमचे घरी पंढरीची वारी आहे. ती यार्षी खंडित झाल्याने मन व्यथित झाले आहे. आषाढवारीविना नाही, आवड दुसरी काही. पंढरीचा विठुराया जळी, स्थळी सर्वव्यापी आहे. शुद्ध अंत:करणात तो वसलेला आहे.- जनार्धन ठाकरेलोहारी चिंचखेड, ता. अकोट

 

 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAkolaअकोलाPandharpur Wariपंढरपूर वारी