शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'त्या' मृत्युच्या गुफेत गेलेले कोणीच आजवर परतले नाही; का? वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 18, 2021 19:47 IST

दुसरे सांगतात त्या गोष्टी ऐका, त्याचा विचार करा आणि तुमच्या मनाला पटेल, तीच कृती करा. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे...!'

'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. याचा अर्थ असा, की दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शहाणे व्हायचे असते. परंतु, दरवेळी दुसरे सांगतात म्हणून आपण आपले मत बनवायचे नसते, कधी कधी काही गोष्टी स्वानुभवातूनही शिकायच्या असतात. आयुष्यात थोडाफार धोका प्रत्येकाला पत्करावाच लागतो. जिंकलो तर यश मिळते आणि हरलो तर अनुभव! हेच शिकवणारी एक बोधकथा...

एका गावात एक गुफा होती. अतिशय भयाण असा तिचा परिसर होता. तिथे जायला गावकरी घाबरत असत. ज्याने तिथला रस्ता धरला तो तिथून कधीच परतला नाही, असा आजवरचा इतिहास होता. 

त्या गावात एक सरकारी कर्मचारी बाहेर गावातून आला होता. गावाचा फेरफटका मारत एक दिवस त्याने गुफेकडे जाणारी पायवाट पाहिली. त्याने गावकऱ्यांकडे चौकशीदेखील केली. कोणी त्याला उत्तर दिले नाही. कर्मचाऱ्याने सरपंचांना गाठले. तो त्यांना म्हणाला, 'सरपंच, गावकरी मला त्या गुफेबद्दल काहीच सांगत नाहीत. तुम्ही तरी सांगा, असे काय विशेष आहे त्या गुफेत?'

सरपंच भीतभीत म्हणाले, 'आम्ही सगळे तिला मृत्यूची गुफा म्हणतो. तिथे गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही.'कर्मचारी म्हणाला, `ही सगळी अंधश्रद्धा आहे. तुम्ही स्वत: कधी अनुभव घेतला आहे का?'सरपंच म्हणाले, `मृत्यूच्या वाटेवर आपणहून कोण चालत जाईल? आम्ही कोणीच तिथे जात नाही, तुम्हीसुद्धा जाऊ नका!'कर्मचारी म्हणाला, `मी तुम्हा सगळ्यांचा भ्रम दूर करतो. उद्या सकाळी सगळ्या गावकऱ्यांसमोर मी त्या गुफेत जातो.'

गावभर चर्चा झाली. सगळे गावकरी उत्सुकतेने त्या वाटेवर जमले. सरकारी कर्मचारी अगदी उत्साहाने गावकऱ्यांचा निरोप घेऊन त्या वाटेने निघाला. बिंदूचा ठिपका होईपर्यंत गावकरी त्याची पाठमोरी आकृती पाहत राहिले. पुढे तो दिसेनासा झाला.

इकडे कर्मचारी गुफेत पोहोचला. तिथे त्याला काळाकुट्ट अंधार दिसला. तो आत चालत राहिला. तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी जोरात धक्का दिल्याचा भास झाला. तो घाबरला. अडखळत पुढे जाऊन पडला. तर पुढे त्याला लख्ख प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात त्याला अनेक लोकही दिसले. तो त्या दिशेने चालू लागला. तिथल्या लोकांना भेटला. त्यांना विचारले, तुम्ही कोण?

यावर लोक म्हणाले, 'आम्ही या मृत्यूच्या गुफेचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलो होतो. परंतु इथे आल्यावर आम्हाला कळले, की गावात ज्या सुख सुविधा नाहीत, त्या सर्व इथे आहेत. मग आम्ही परत गेलोच नाही, इथेच रमलो.'

कर्मचाऱ्याला त्यांचे म्हणणे पटले. त्यालाही ती नवी दुनिया आवडली. तोही तिथेच रमला. गावकरी मात्र त्यालाही मृत्यूच्या गुपेâने गिळला, या विचाराने परतले आणि एका स्वर्गासमान असणाऱ्या नव्या दुनियेला मुकले.म्हणून दुसरे सांगतात त्या गोष्टी ऐका, त्याचा विचार करा आणि तुमच्या मनाला पटेल, तीच कृती करा. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे...!'