शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नित्य नाम वाचे तोचि एक धन्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:07 IST

संतजण म्हणतात मानसिक समाधान मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

प्रचलीत स्पर्धात्मक धावपळीच्या जीवन वाटचालीत माणसाला नामस्मरण करायलाही वेळ नाही आणि तेवढा उत्साहही नसतो. परंतु संतजण म्हणतात मानसिक समाधान मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग  तोही पैसे न खर्च न करता कोणता असेल तर केवळ ‘नामस्मरण’ होय. बाह्य जगातील भाैतिक सुविधांच्या विलासात मनाला अजिबात समाधान लाभत नाही. तेव्हा मनुष्य नकळत परमेश्वराकडे धाव घेतो. प्रभुचे नुसते नामस्मरण जरी केले तरी विविध विकारापासून सुटका होते. नाम तुझे देवा, केशवा माधवा। कोणतेही घ्यावे गोडावा तयात।।संत ज्ञानेश्वर महाराज हरीपाठात सांगतात - सात पाच तीन दशकांचा मेळा, एक तरवी कळा दावी हरी।तैसे नव्हे नाम सर्वमार्गा वरीष्ठ, तेथे काही सर्वमार्गा लगती।।सात म्हणजे योगमार्गाच्या ७ पायऱ्या ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यानाचा समावेश होतो. ह्यापासून समाधी साधणे होय. पाच म्हणजे पंचाग्नी साधनाचा तपोमार्ग आणि तीन रूपे स्थुल, सुक्ष्म, कारण ह्याच निरास करून, त्याच्या पलीकडे असलेल्या परमतत्वाशी समरसता आणि दशकांचा मेळा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेद्रीये मिळून दमनाचा मार्ग निर्माण करणे हे सर्व मार्ग व्यवस्थितपणे घडले तर श्रीहरीची एकतत्वी कळा प्रत्यक्षास येवू शकते. परंतु माऊली म्हणतात हे सर्व मार्ग अतिशय कष्टमय आहेत. नाममार्ग मात्र तसा नाही. येथे उपासना करणाऱ्याला कोणतेच कष्ट नाही. नाम मार्ग  हा श्रेष्ठ असा पंथराज असल्याचे माऊली स्पष्ट करतात. संत निवृत्तीनाथ वर्णन करतात. नित्य नामवाचे तोचि एक धन्य । त्याचे शुध्द पुण्य इथे माऊली म्हणतात रामकृष्ण नाम जपाचे महत्व आपल्या चिंतनातून मांडले आहे.नामा म्हणे नाम ओंकाराचे मुळ। परब्रम्ह केवळ रामनाम।।नाथ महाराज - नाम जयापाशी असे। नारायण तेथे वसे।।संत जनाबाई - रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप। पापाचे कळप पळती पुढे।।संत तुकोबा - हेचि सर्व सुख जपावा विठ्ठल। न दवडावा पळ क्षण वाया।।संत रामदास - हरे राम मंत्र सोपा, जपारे।संत विठोबाराय - संत एकाती बैसले । सर्व  सिध्दांत शोधीलेसार काढीले निवडोनी । ते हे श्री हरीचे नाम।।

संत सेना महाराज - अवघे काळी वाचे म्हणा नारायण। सेना म्हणे क्षण जावू न द्या।। नामस्मरणाच्या बळावरच संतांना संतपण प्राप्त झाले. दुर्लभ जीवनाचे कल्याण हे नामाचे स्मरणात असल्याने नाम हेच देवाचे रूप समजून त्याचा अंगीकार करायला हवा, संत तुकोबाराय म्हणतात नाशीवंत देह नासेल हा जाण। कारे उच्चाराना वाचे नाम। तुका म्हणे नाम वेदासी आगळे। ते दिले गोपाळे फुकासाठी.

 : हभप डाॅ.ज्ञानेश्वर मिरगेशेगाव

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक