शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला गृहीणींनी शोधलेले पर्याय आणि भारुडकरांनी दिलेले शालजोडे; वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 11:17 IST

Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला अन्न आणि पाणी दोन्ही ग्रहण करायचे नाही, हे सांगूनही सुगरण बायकांना काय पर्याय सुचतात याच भारुडात केलेलं वर्णन वाचा.

भारूड हा शब्द उच्चरताच आठवण होते, ती संत एकनाथ महाराजांची. भारूड नामक काव्यातून समाजातील परिस्थितीचे मार्मिक वर्णन केले जाते. नाथ महाराजांनी सुरू करून दिलेली परंपरा अद्याप सुरू आहे. चंदाताई तिवाडी यांचा बुरगुंडा, निरंजन बाक्रे यांचा विंचू चावला, शाहीर साबळे यांचा दादला नको गं बाई अशी अनेक भारुडे आपण ऐकली असतील. अलीकडच्या काळात या सर्व कलाकारांनी त्याला आधुनिक विषयांची जोड देऊन भारूड काव्य जिवंत ठेवले आहे. त्यातलाच एक प्रकार आज निर्जला एकादशीच्या निमित्ताने खास लोकमत वाचकांसाठी... 

शिरपूर, धुळे जिल्हा येथील श्रीमती विजयाबाई गाडगीळ यांनी निर्जला एकादशीचे गमतीदार भारूड लिहिले आहे. 'एकादशी आणि दुप्पट खाशी' असे आपण नेहमी म्हणतो आणि तसे वागतोही. पण निर्जला एकादशीला तर पाणीही प्यायचे नसते. तसे असताना आपण पाण्याला पर्याय कसा शोधत जातो, याचे रसभरीत वर्णन त्यांनी या भारुडात केले आहे... 

बाई माझी एकादशी, एकादशी, पाणी पिऊ कशी? पाणी पिऊ कशी?बाई माझी एकादशी।।

सुनेने केला सुंठवडा,मला म्हणाली देऊ का थोडा, अहो आग झाली अशी, बाई माझी एकादशी ।।१।।

शेजारणीने केला शिंगाड्याचा शिरा,मला म्हणाली देऊ का जरा, तिला नाही म्हणू कशी, बाई माझी एकादशी ।।२।।

मैत्रिणीने केले साबुदाण्याचे वडे,त्यातले मी खाल्ले ५-७ थोडे, आता आणखी मागू कशी,बाई माझी एकादशी ।।३।।

लेकीने केला दुधाचा चहा,(आज निर्जला एकादशी आहे ना, म्हणून बिना पाण्याचा चहा)मला म्हणाली पिऊन तर पहा,तिला नाही म्हणू कशी?बाई माझी एकादशी ।।४।।

अहो पण अशी एकादशी करून का फळ मिळणारे? म्हणून... तुम्ही एकादशी करा, आणि त्या विठ्ठलाचे स्मरण करा,तरच, जागा मिळेल पायाशी,बाई माझी एकादशी ।।५।।

टॅग्स :foodअन्न